जगातील 'या' १० देशांमध्ये सर्वात जास्त सोन्याचा साठा; भारताचा नंबर कितवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:22 IST2025-03-19T14:52:02+5:302025-03-19T16:22:29+5:30

largest gold reserves : आज आम्ही तुम्हाला अशा १० देशांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याकडे जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. या टॉप 10 देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

सोने हे गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित साधन समजलं जातं. त्यामुळेच मोठमोठे देशही सोन्याचा साठा करत असतात. सोन्याचा साठा नसणार देश दुर्मिळच म्हणावा लागेल.

काही देशांमध्ये हा साठा जास्त असेल तर काही देशांकडे कमी. जगातील कोणत्या देशाकडे सर्वाधिक सोने आहे? हे माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला अशा १० देशांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे. या टॉप १० देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहेच. पण त्यांच्याकडे सोन्याचे भांडारही मोठे आहे. अमेरिकेच्या तिजोरीत ८१३३ टन सोने आहे.

या यादीत दुसरे स्थान जर्मनीचे आहे. या देशाकडे ३३५३ टन सोने आहे. तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. इटलीमध्ये २४५२ टन सोने आहे. तर फ्रान्स २४३७ टन सोन्यासह चौथ्या स्थानावर आहे.

जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेल्या देशांमध्ये रशिया पाचव्या क्रमांकावर आहे. रशियाकडे एकूण २३३५ टन सोने आहे. २२६४ टन सोन्यासह चीन या यादीत सहाव्या स्थानावर आहे. याशिवाय ७ व्या स्थानावर स्वित्झर्लंडचा आहे. येथे १०४० टन सोने आहे.

जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक ८वा आहे. भारताकडे एकूण ८७६ टन सोने आहे. जपान नवव्या स्थानावर असून त्यांच्याकडे ८४६ टन सोने आहे. तर नेदरलँड ६१२ टन सोन्यासह १०व्या स्थानावर आहे.