Top 5 investment options ppf scss sfb kvp that offer higher returns than bank fixed deposits
हे 5 पर्याय देतात बँक फिक्स डिपॉझिटपेक्षाही अधिक रिटर्न, यांत गुंतवणूक केली तर व्हाल मालामाल! By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 13, 2020 12:18 PM2020-10-13T12:18:07+5:302020-10-13T12:32:47+5:30Join usJoin usNext बँक एफडीमध्ये कमी व्याज (return) मिळत असल्याने आपल्या पैशांची इतरत्र गुंतवणूक करावी, अशी अनेक गुंतवणूकदारांची इच्छा असते. फिक्स्ड डिपॉझिटवरील (एफडी) व्याजदर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घसरत आहे. आणि आता या व्याजदराने गेल्या 12 वर्षांतील निचांक गाठला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया विविध टेन्यूअरमध्ये 2.9 टक्के आणि 5.4 टक्के व्याजदर देत आहे. सध्या एफडीचा व्याजदर आणि बचत खात्याचा व्याजदर जवळपास सारखाच आहे. बँका छोट्या कालावधीसाठी एफडीवर बचत खात्याच्या तुलनेत कमी व्याजदर देतात. यामुळे दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक केली तर आपल्याला मोठा फायदा मिळवू शकतो. तर जाणून घेऊयात अधिक व्याज देणाऱ्या 5 मोठ्या पर्यायांसंदर्भात. किसान विकास पत्र (KVP) - ही भारतातील पोस्ट ऑफीसमध्ये दिली जाणारी चांगली योजना आहे. या योजवेत सध्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी 6.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. ही पूर्णपणे जोखीममुक्त गुंतवणूक आहे. सरकारकडून दर तिमाहीला KVP योजनेच्या व्याजदराची घोषणा केली जाते. या योजनेत किमान एक हजार रूपयांची गुंतवणूक करता येऊ शकते. तसेच या योजनेत जास्तीत जास्त रकमेसाठी गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. राष्ट्रीय बचत पत्र (NSC) - सध्या एनएससीमध्ये वर्षाला 6.8 टक्के व्याजदर आहे. मात्र हे व्याज मॅच्युरिटीवर मिळते. 10 वर्षाहून अधिक वयाची मुले एएससी खरेदी करू शकतात. पोस्टाच्या बचत योजनांमध्ये एनएससी गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. महत्वाचे म्हणजे, ज्यांना आपली सेव्हिंग्स सुरक्षित ठेवायची आहे. अशा लोकांसाठी हे प्रमाणपत्र सुरक्षित आणि उपयोगी आहे. वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) - ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती SCSSमध्ये गुंतवणूक करू शकतात. सध्या SCSSमध्ये दर वर्षाला ७.४ टक्के व्याजदर मिळते. याचा मॅच्युरिटीचा कालावधी ५ वर्षे आहे. मॅच्युरिटीनंतर खात्याला पुढे तीन वर्षे चालू ठेवता येते. बँक एफडी - काही लहान बँका (SFB) काही एफडीवर ८ ते ९ टक्के व्याज देतात. भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि इतर कर्जदाताच्या तुलनेत या बँकांकडून दिले जाणारे व्याज निश्चितपणे आकर्षक असतात. सामान्य ग्राहकांच्या तुलनेत वरिष्ठ नागरिकांना या जमा पैशांवर 50 आधार अंक अधिक मिळतात. कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट - अधिक गँरंटेड रिटर्न शोधत असलेल्यांसाठी कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट बँक फिक्स डिपॉझिटचा पर्याय असू शकतो. यावर ७ ते ८ टक्के रिटर्न्स मिळतात. कॉर्पोरच एफडीमध्ये जोखीम अधिक असते. ज्यांना मोठ्या रिटर्नसाठी इक्विटी म्युच्युअलफंडमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा नसते, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. टॅग्स :गुंतवणूकबँकपोस्ट ऑफिसपैसाInvestmentbankPost OfficeMONEY