इराक, कुवैतच्या GDP पेक्षा 'या' कुटुंबीयांची संपत्ती अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 05:01 PM2020-01-20T17:01:45+5:302020-01-20T17:08:45+5:30

जगातील श्रीमंत व्यक्तींबाबत तुम्हाला माहिती असेल. मात्र, जगातील श्रीमंत कुटुंबीयांबाबत माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबं, ज्यांची संपत्ती इराक, कतार आणि कुवैतच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे...

ब्लूमबर्गच्या वार्षिक रिपोर्टनुसार, जगातील पाच सर्वात श्रीमंत कुटुंबीयांमध्ये पाचव्या स्थानावर शनेल ब्रांडचे मालक वेर्दाइमर कुटुंब आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 57.6 अरब डॉलर इतकी आहे.

या यादीत चौथ्या स्थानावर सौदी अरबियाचे राजेशाही कुटुंब आहे. अल सऊद कुटुंबाची एकूण संपत्ती 100 अरब डॉलर इतकी आहे.

तिसऱ्या स्थानावर कोच कुटुंब आहे. कोच इंडस्ट्रीशी संबंधित या कुटुंबाकडे एकूण 124.5 अरब डॉलर इतकी संपत्ती आहे.

दुसऱ्या स्थानावर मार्स कुटुंबाचे नाव आहे. स्नीकर्स चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीची मालकी या कुटुंबाकडे आहे. या कुटुंबीयांची एकूण संपत्ती 126.5 अरब डॉलर इतकी आहे.

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जगातील सर्वात श्रीमंत वॉलटन कुटुंब आहे. वॉलमार्ट कंपनीची मालकी वॉलटन कुटुंबीयांकडे आहे. या कुटुंबीयांची एकूण संपत्ती 190.5 अरब डॉलर इतकी आहे.