'या' भारतीय वंशाच्या सीईओंचं शिक्षण किती झालंय माहितीय का? By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 11:02 PM 2018-06-15T23:02:52+5:30 2018-06-15T23:03:50+5:30
सत्या नाडेला यांचा जन्म हैदराबादमधील एका तेलुगु कुटुंबात झाला. सध्या ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. त्याआधी त्यांच्याकडे मायक्रोसॉफ्ट क्लाऊड अँड एंटरप्रायझेस समूहाच्या कार्यकारी उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्समधीन त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे. याशिवाय त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ विसकोन्सिनमधून कॉम्युटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधून एमबीएदेखील केलं.
सुंदर पिचाई यांचा जन्म तामिळनाडूत झाला आहे. पिचाई गुगलचे सीईओ आहेत. ग्रॅज्युएशन: आयआयटी खडगपूरमधून मेटलर्जीमध्ये बीटेक पोस्ट ग्रॅज्युएशन: स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधून एमएस एमबीए: युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्वेनियामधील वॉर्टन स्कूलमध्ये शिक्षण
शंतनू नारायण यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला. अॅडॉब सिस्टम्सचे सीईओ होण्याआधी त्यांच्याकडे याच कंपनीत अध्यक्ष आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते. ग्रॅज्युएशन: उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.टेक पोस्ट ग्रॅज्युएशन: बाऊलिंग ग्रीन स्टेट ग्रॅज्युएशन, ओहियोमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स एमबीए: युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्निया, बर्केले
फ्रान्सिस्को डिसुजा यांचा जन्म एका कोकणी कुटुंबातील आहे. 1968 मध्ये आफ्रिकेतील नैरोबीमध्ये त्यांचा जन्म झाला. सध्या ते कॉग्निझंट कंपनीत सीईओ म्हणून काम करत आहेत. ग्रॅज्युएशन: युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एशियामधून बीबीए एमबीए: कॉर्नेगी-मेलन युनिव्हर्सिटी
चंदा कोचर मूळच्या राजस्थानमधील जोधपूरच्या आहेत. भारतातील रिटेल बँकिंगच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्या आयसीआयसीआय कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ आहेत. ग्रॅज्युएशन: मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीई पोस्ट ग्रॅज्युएशन: जय हिंद कॉलेजमधून कॉस्ट अकाऊंटन्सीमध्ये एमए एमबीए: जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई
इंद्रा नुई या मूळच्या चेन्नईच्या आहेत. 2007 आणि 2008 मध्ये जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश होता. त्या पेप्सिको कंपनीच्या सीईओ आहेत. ग्रॅज्युएशन: युनिव्हर्सिटी ऑफ मद्रासच्या मद्रास किस्चन कॉलेजमधून जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात बीए एमबीए: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता