Aadhaar क्रमांकाद्वारे अवघ्या काही मिनिटांत तयार करा तुमचं ePAN कार्ड; पाहा प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 04:25 PM2021-05-23T16:25:43+5:302021-05-23T16:32:08+5:30

Aadhaar Card प्रमाणेच PAN Card हेदेखाली महत्त्वाचे दस्तऐवज आहे.

जसं अनेक कामांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे त्याप्रमाणे पॅन कार्ड हेदेखील (PAN Card) आर्थिक कामांसाठी महत्त्वाचं आहे.

पॅन कार्ड तयार करायचं असेल तर अधिक त्रास घेण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्यादेखील पॅन कार्ड तयार करू शकता.

तुमच्या आधार क्रमांकाच्या मदतीनं आता अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही पॅन कार्ड तयार करू शकता. आधार कार्डाच्या मदतीनं पॅन कार्ड तयार करण्याची सुविधा मोफतही आहे.

पॅन कार्ड इन्कम टॅक्स विभागाकडून (Income Tax Department) जारी केलं जातं. तसंच यामध्ये १० अंक अल्फान्युमरिक असतात. पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला १० मिनिटांमध्ये पीडीएफद्वारे त्याचं पॅन कार्ड मिळेल.

नव्या पॅन कार्डसाठी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल. e-PAN साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांकही द्यावा लागेल.

यासाठी मोबाईल क्रमांकासोबत आधार क्रमांक लिंक असणं आवश्यक आहे. केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असणं अनिवार्य आहे.

पॅन कार्ड तयार करण्यासाठी सर्वप्रथन इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरील ई फायलिंग पोर्टलवर जा. त्यानंतर ‘Instant PAN through Aadhaar’ वर क्लिक करून ‘Get New PAN’ सिलेक्ट करा.

नव्या पॅन कार्डसाठी तुमचा आधार क्रमांक एन्टर करा. त्यानंतर Captcha कोड टाकून आपल्या आधार लिंक्ड मोबाईलवर OTP जनरेट करा. ओटीपी टाकून डिटेल व्हेरिफाय करा.

यानंतर तुम्ही तुमचं पॅन कार्ज PDF फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला ‘Check Status/ Download PAN’ वर आधार नंबर टाकाववा लागेल.

जर तुमचा आधार क्रमांकासोबत ईमेल आयडी रजिस्टर असेल तर तुम्हाला ईमेलद्वारे PDF फॉर्मेटमध्ये PAN कार्ड मिळेल.