₹55 वरून आपटून थेट ₹6 वर आला हा शेअर! एका बातमीनं केला चमत्कार, आता खेरेदीसाठी तुटून पडले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 04:53 PM2023-12-29T16:53:56+5:302023-12-29T17:01:11+5:30

हा शेअर व्यवहारादरम्यान 6 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला होता. या शेअरमध्ये आलेल्या तेजी मागे एक विशेष कारणही आहे.

शेअर बाजारात टोयम स्पोर्ट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये आज अर्थात शुक्रवारी जबरदस्त तेजी दिसून आली आहे. कंपनीच्या शे्रमध्ये 4% ची तेजी दिसून आली आहे. हा शेअर व्यवहारादरम्यान 6 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला होता. या शेअरमध्ये आलेल्या तेजी मागे एक विशेष कारणही आहे.

बॉलीवूड स्टार आणि फिटनेस आयकॉन सुनील शेट्टीने वर्ल्ड टेनिस लीगमध्ये टीम टीएसएल हॉक्सला आपली स्टार पॉवर दिली आहे. तसेच BSE-लिस्टेड स्पोर्ट्स कंपनी टोयाम स्पोर्ट्स लिमिटेड (TSL) चे ब्रँड अॅम्बेसेडर आणि पॅसिफिक स्टारचे मालक म्हणून आपली उपस्थिती मजबूत केली आहे.

टोयम इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना 1985 मध्ये झाली होती. ही कंपनी कमोडिटी व्यवसाय, वित्त व्यवसाय, रेस्टॉरंट व्यवसाय आणि इव्हेंट व्यवसायात काम करते. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे.

कंपनीचा 0.54 टक्के हिस्सा FII च्या मालकीचा आहे आणि उर्वरित 99.46 टक्के हिस्सा जनतेकडे आहे. या कंपनीवर सध्या फार कमी म्हणजे 0.79 कोटी रुपये एवढे कर्ज आहे.

असी आहे शेअरची स्थिती - या शेअरचा 52-आठवड्यांचा उच्चांक 19.45 रुपये आणि निचांक 4.65 रुपये एवढा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप 300 कोटी रुपयांहून अधिक आहे. हा स्टॉक आपल्या 52-आठवड्यांच्या निचांकावरून 24 टक्के वर आहे. तसेच उच्चांकाच्या तुलनेत 71 टक्के खाली आहे.

या वर्षात YTD मध्ये कंपनीचा शेअर 63% तर वर्षभरात 65% पर्यंत घसरला आहे. चार वर्षात हा शेअर 90% पर्यंत घसरला आहे. या कालावधीत याची किंमत 55 रुपयांवरून घसरून सध्याच्या किंमतीवर आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)