६५० रुपयांची SIP की Elon Musk यांच्या ट्विटरची ब्लू टिक, जाणून घ्या फायद्याची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:12 PM2022-11-09T12:12:42+5:302022-11-09T13:07:02+5:30

SIP Investment : जर तुम्हाला ब्लू टिक हवी असेल तर मस्क एका युझरकडून १० वर्षांमध्ये 78 हजार रुपये घेतील. पण जर तुम्ही तीच गुंतवणूक केली तर पाहा तुमचा किती फायदा होईल.

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटर खरेदी केली. यानंतर मस्क यांनी धडाधड निर्णय घेत काही मोठे बदल केलेत. त्यातील पहिला बदल म्हणजे ट्विटरवर आता ब्लू टिक हवी असल्यास पैसे भरावे लागणार आहेत.

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटर खरेदी केली. यानंतर मस्क यांनी धडाधड निर्णय घेत काही मोठे बदल केलेत. त्यातील पहिला बदल म्हणजे ट्विटरवर आता ब्लू टिक हवी असल्यास पैसे भरावे लागणार आहेत.

ट्विटर आपल्या युझर्सना ब्लू टिक तेव्हाच देते जेव्हा कंपनी संबंधित अकाऊंट्स व्हेरिफाय करते. यापूर्वी ब्लू टिकसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. परंतु आता मस्क यांनी ते पेड केले आहे.

ब्लू टिक हवी असल्यास युझर्सना आता महिन्याला आठ डॉलर्स म्हणजेच जवळपास 650 रुपये द्यावे लागतील. यावरूनच जाणून घेऊ की ट्विटरची ब्लू टिक घेण्याऐवजी जर तुम्ही महिन्याला 650 रुपयांचा सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन घेतला, तर त्यातून तुम्हाला काय फायदा मिळेल.

ब्लू टिकसाठी पैसा देणं ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नाही. परंतु ब्लू टिक असल्यावर ते अकाऊंट व्हेरिफाईड असल्याचं म्हटलं जातं. ब्लू टिक आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी वेगळ्या जरी असल्या तरी तुम्ही त्याच महिन्याला खर्च करणाऱ्या 650 रुपयांमध्ये मोठी रक्कम जमा करू शकता.

दोन्ही गोष्टींची तुलना करताना 10 वर्षांचा हिशोब लक्षात घेता येईल. जर एखाद्या व्यक्तीनं 650 रुपये देण्याचा निर्णय घेतला तर 10 वर्षांमध्ये त्याला 78 हजार रुपये द्यावे लागतील. ट्विटरच्या 10 वर्षांच्या ब्लू टिकचा खर्च 78 हजार रुपये होईल.

जर कोणत्याही व्यक्तीनं दर महिन्याला एसआयपीमध्ये 650 रूपये जमा केले, तर त्याच्याकडे १० वर्षांच्या अखेरीस 78 हजार रुपयांची बचत होईल. ही रक्कम संपूर्णपणे तुमचीच असेल. इतकंच काय तर यावर तुम्हाला नफा मिळेल तो वेगळाच.

या एसआयपीवर किमान 12 टक्क्यांचा नफा जोडला तर तुम्हाला 10 वर्षांमध्ये दुप्पट रक्कम मिळेल. एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीनं हिशोब करायचा झाल्यास 10 वर्षांमध्ये 650 रुपयांच्या हिशोबानं 78000 रुपये जमा होतील. त्यावर 12 टक्क्यांच्या हिशोबानं 73000 हजार रुपयांचा रिटर्न मिळेल.

याचाच अर्थ जेवढे पैसे तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवले, जवळपास तितकेच पैसे 10 वर्षांनी तुमच्या खात्यात जोडले जातील. याप्रकारे महिन्याला 650 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला 10 वर्षांत जवळपास 1.5 लाख रुपये देईल. तर ट्विटर तुमच्याकडून ब्लू टिकसाठी 650 रुपयांच्या हिशोबानं 10 वर्षांसाठी 78 हजार रुपये घेईल.