३ शेअर्सवर दोन बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, गुंतवणूकदारांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 01:15 PM2022-10-09T13:15:24+5:302022-10-09T13:20:59+5:30

गुंतवणूकदार जेव्हा स्टॉकवर पोझिशन घेतात तेव्हा कंपनी वेळोवेळी बोनस शेअर्स आणि डिव्हिडंट देतेय की नाही याकडेही लक्ष देत असतात.

गुंतवणूकदार जेव्हा स्टॉकवर पोझिशन घेतात तेव्हा कंपनी वेळोवेळी बोनस शेअर्स आणि डिव्हिडंट देतेय की नाही याकडेही लक्ष देत असतात. U.H. Zaveri Ltd या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचा आनंद यावेळी द्विगुणीत होणार आहे. जबरदस्त परताव्यानंतर कंपनी आता गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. ज्यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आली आहे.

नियामकाला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येकी 3 शेअर्समागे 2 शेअर्स बोनस म्हणून दिले जातील. यू.एच.झवेरीच्या संचालक मंडळाने या बोनससाठी 19 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे.

म्हणजेच 19 ऑक्टोबरला ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना हा बोनस शेअर दिला जाईल. कंपनीचे मार्केट कॅप सध्या 22.60 कोटी रुपये आहे.

शुक्रवारी यू.एच. झवेरीचा शेअर 0.14 टक्क्यांनी वाढून 36.90 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. गेल्या 5 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 55.25 टक्के वाढ झाली आहे. 3 वर्षांपूर्वी कोणीही या शेअरमध्ये पैसे गुंतवले असते तर त्याचे रिटर्न वाढून 253 टक्क्यांपर्यंत झाले असते.

जानेवारी 2022 पर्यंत कंपनीच्या एका शेअरची किंमत 12.50 रुपये होती, जी आता वाढून 36.90 रुपयांवर पोहोचली आहे. केवळ या वर्षी, कंपनीने पोझिशनल गुंतवणूकदारांना 195.60 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या शेअर्समध्ये 129.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.