पंतप्रधान नरेंद्र मोदी की टॅक्स भरतात? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 20:08 IST2025-02-02T19:59:25+5:302025-02-02T20:08:47+5:30

पंतप्रधान मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. याचा फायदा मध्यमवर्गीयांना होईल, असे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. लोकसभेतही पंतप्रधान टाळ्या वाजवताना दिसले.

टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आहे. याचा लोकांना फायदा झाला असून जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना आयकर भरावा लागणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी किती टॅक्स भरतात?

पंतप्रधान हे देशातील सर्वात मोठे पद आहे. पंतप्रधान मोदींचे मासिक उत्पन्न १.६६ लाख आहे. यामध्ये ४५०० रुपये संसदीय भत्ता, ३००० रुपये खर्च भत्ता, २००० रुपये दैनिक भत्ता आणि ५० हजार रुपये मूळ वेतनाचा समावेश आहे. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान , लोक कल्याण मार्ग, दिल्ली आहे. एअर इंडिया वन हे विमान खास पंतप्रधानांच्या प्रवासासाठी उपलब्ध असतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना एसपीजी म्हणजेच विशेष संरक्षण गटाद्वारे संरक्षण दिले जाते. पंतप्रधान मोदींना मोफत वैद्यकीय सेवाही मिळते.

सामान्य लोकांप्रमाणे भारताचे पंतप्रधान देखील आयकराच्या अधीन आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनाही आयकर भरावा लागतो.

पंतप्रधान मोदींचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांनाही कर भरावा लागेल. पंतप्रधान मोदींना आता २० टक्के आयकर भरावा लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ३.०२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय ५२ हजार ९२० रुपयांची रोकड आहे. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान मोदींची बहुतांश मालमत्ता एफडीच्या रूपात आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांनी गेल्या आर्थिक वर्षात ३ कोटी ३३ लाख ७९ रुपयांचा कर भरला होता. निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्थावर मालमत्ता क्षेत्रात ‘शून्य’ लिहिलं होतं. त्यामुळे पंतप्रधानांच्या नावावर घर, कार किंवा जमीन नसल्याचे समोर आलं.