Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel नं आणला ढासू प्लॅन, ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी! By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 04:47 PM 2024-07-27T16:47:04+5:30 2024-07-27T17:52:54+5:30
Airtel 365 Days Validity Plan : आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. नवी दिल्ली : एअरटेल (Airtel) ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेलचे युजर्स कोटींच्या घरात आहेत. अलीकडेच, टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या टॅरिफ प्लॅन्सच्या किमती वाढवल्या होत्या.
रिलायन्स जिओने (Reliance Jio) सर्वात आधी आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली. जिओने ३ जुलै रोजी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. यानंतर एअरटेल आणि व्ही (VI) या टेलिकॉम कंपन्यांनी आपले टॅरिफ प्लॅन्स महाग केले.
मात्र, या वाढीनंतर तुम्हाला एअरटेलचा वर्षभराचा प्लॅन कमी किमतीत हवा असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे.
एअरटेल कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये इतरही अनेक प्लॅन्स आहेत, ज्यांची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. पण, आम्ही तुम्हाला ज्या प्लॅनची माहिती देत आहोत, त्याची किंमत १,९९९ रुपये आहे.
हा कंपनीची सर्वोत्तम लाँग टर्म प्लॅन आहे. यामध्ये युजर्सला सर्वात कमी किमतीत ३६५ दिवसांची दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते.
याचा अर्थ तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके मोफत कॉलिंग करू शकाल. याशिवाय युजर्सला दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये युजरला २४ जीबी डेटा मिळतो.
दरम्यान, युजर्स अतिरिक्त डेटा देखील खरेदी करू शकतो. यासाठी युजर्सला डेटा व्हाउचर वापरावं लागेल. ज्या युजर्सना कमी डेटा आणि अधिक व्हॅलिडिटी असलेला प्लॅन हवा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय आहे.
या प्लॅनसह युजर्सना अॅडिशनल बेनिफिट्स देखील मिळतात. यामध्ये युजरला अपोलो २४*७ सर्कलमध्ये तीन महिने फ्री अॅक्सेस मिळतो.
यासोबतच यूजरला विंक आणि विंक म्युझिकवर मोफत हॅलो ट्यूनची सुविधाही मिळते. याशिवाय, ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एअरटेलच्या प्लॅनची किंमत ३,५९९ रुपये आणि ३,९९९ रुपये आहे.