US Dollar Vs Indian Rupees: डॉलरपेक्षा रुपया कमकुवत, अर्थव्यवस्थेचं नुकसान, पण या लोकांची चांदी, होतोय फायदाच फायदा

By बाळकृष्ण परब | Published: July 17, 2022 02:55 PM2022-07-17T14:55:44+5:302022-07-17T15:08:16+5:30

US Dollar Vs Indian Rupees: सध्या जागतिक स्तरावर डॉलर प्रचंड मजबूत होत आहे, डॉलरच्या तुलनेत आपल्या रुपयाच्या मूल्यामध्येही मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७९.९९ या ऐतिहासिक निचांकावर पोहोचला होता. रुपया कमकुवत होणं अर्थव्यवस्थेसाठी नुकसानकारक आहे. मात्र या काळात काही लोकांची मात्र चांदी होत असून, त्यांना बंपर फायदा मिळत आहे.

सध्या जागतिक स्तरावर डॉलर प्रचंड मजबूत होत आहे, डॉलरच्या तुलनेत आपल्या रुपयाच्या मूल्यामध्येही मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७९.९९ या ऐतिहासिक निचांकावर पोहोचला होता. रुपया कमकुवत होणं अर्थव्यवस्थेसाठी नुकसानकारक आहे. मात्र या काळात काही लोकांची मात्र चांदी होत असून, त्यांना बंपर फायदा मिळत आहे.

एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अमेरिकेत राहत असेल आणि तिने तिथे डॉलरमध्ये मिळणारा पगार हा भारतात पाठवला तर कुटुंबाला एक्सेंजनंतर ती रक्कम रुपयामध्ये मिळते, अशा स्थितीत अमेरिकेतून एक डॉलर आल्यास इथे त्या बदल्यात संबंधितांना ८० रुपये मिळत आहेत.

ही रक्कम डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या असलेल्या किमतीनुसार मिळते. म्हणजे एका डॉलरची किंमत ही ७० रुपये असती तर त्याबदल्यात ७० रुपयेच मिळाले असते. म्हणजेत १० रुपये नुकसान झाले असते. अशा प्रकारे रुपया कमकुवत झाल्याने त्याचा फायदा या लोकांना मिळत आहे.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार २०२० मध्ये भारतात परदेशातून ८३ अब्ज डॉलर एवढी रक्कम आली होती. तर २०२१ मध्ये हीच रक्कम वाढून ८७ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचली होती. परदेशात नोकरी करणारे भारतीय मोठ्या प्रमाणात रक्कम भारतात पाठवतात. त्यामुळे देशाच्या परकीय गंगाजळीमध्ये लक्षणीय भर पडत असते.

जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरते तेव्हा त्याचा फायदा हा निर्यातदारांना होता. सॉफ्टवेअर कंपन्या, फार्मा कंपन्या याचा फायदा उठवतात. कारण त्यांना पेमेंट हे डॉलरच्या स्वरूपात मिळते. त्याचं मूल्य भारतात आल्यावर वाढतं.

मात्र काही निर्यातदारांना वाढत्या महागाईमुळे याचा पुरेसा फायदा उचलता येत नाही. कारण त्यांच्या प्रॉडक्टसाठीचा खर्चही वाढलेला असतो. पेट्रोलियम प्रॉडक्ट, ऑटोमोबाईल, मशिनरी सामान यांचा खर्च वाढतो.

भारत हा निर्यातीपेक्षा आयात करणारा देश आहे. म्हणजेत आपण अनेक वस्तू परदेशातून मागवतो. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने आयातीसाठी भारताला अधिक खर्च करावा लागतो.

तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमकुवत होत गेल्याने देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीमध्येही मोठ्या प्रमाणात घट होते.