या दोन बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर आजपासून 'हा' नियम बदलला; त्वरीत जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 09:26 AM2021-03-01T09:26:25+5:302021-03-01T09:41:18+5:30

Bank Of Baroda : देशातील तिसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक, बँक ऑफ बडोदाने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : जर तुमचे खाते बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँकेचे (Dena Bank) IFSC कोड बदलणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) विलीनीकरण केले होते. यानंतर या दोन्ही बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदामधील ग्राहक झाले.

यामुळे 1 मार्चपासून विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँकेचे (Dena Bank) IFSC कोड बंद आहेत. म्हणजेच ग्राहकांना आता नवा IFSC कोड आवश्यक असणार आहे.

देशातील तिसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक, बँक ऑफ बडोदाने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ई-विजया आणि ई-देना आयएफएससी कोड 1 मार्च 2021 पासून बंद होणार आहेत. ई-विजया आणि देना बँक शाखांकडून नवीन आयएफएससी कोड मिळवा, असे बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे.

IFSC कोड बंद झाल्यानंतर याचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. कारण, कुठल्याही ऑनलाईन व्यवहारासाठी तुम्हाला बँकेचा आयएफएससी कोड लागतो. यामुळे त्वरित तुमचा नवा कोड माहिती करून घ्या अन्यथा 1 फेब्रुवारीपासून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही.

IFSC Code तुम्ही मेसेजकरूनही मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला “MIGR Space Last 4 digits of the old account number” असा मेसेज करावा लागेल. या मेसेज तुम्ही नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून या 8422009988 वर पाठवा.

जर तुम्हाला IFSC कोडशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर 1800 258 1700 वर कॉल करून थेट बँकेशी बोलू शकता.

IFSC कोड म्हणजे 11 अंकांचा एक कोड असतो. रिझर्व्ह बँकेकडून सर्व बँकांना हा कोड दिला जातो. याच्या सुरुवातीच्या चार अंकांवरुन बँकेचे नाव कळते. या कोडचा इलेक्ट्रिक पेमेंटसाठी वापर केला जातो. या कोडद्वारे बँकेच्या कोणत्याही शाखेला ट्रॅक करता येऊ शकते. याला तुम्ही बँक खाते आणि चेक बुकद्वारे शोधू शकता.

बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे की, ग्राहकांना त्यांच्या बँक शाखेतून 31 मार्च 2021 पर्यंत नवीन एमआयसीआर कोडसह चेक बुक मिळू शकेल. याशिवाय, तुम्ही नेट बँकिंग / मोबाइल बँकिंगद्वारे नवीन चेकबुकसाठी अप्लाय करू शकता.