मुकेश अंबानींचे जुने मित्र; राधिका मर्चंटच्या वडीलांचे देशातील अब्जाधीशांच्या यादीत नाव... By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 04:17 PM 2024-07-05T16:17:34+5:30 2024-07-05T16:22:09+5:30
Viren Merchant Net Worth : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी येत्या 12 जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. Radhika Merchant Father Viren Merchant Net worth: रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी, यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. राधिका, ही प्रसिद्ध उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन यांचाही देशातील टॉपच्या अब्जाधीश उद्योगपतींमध्ये समावेश आहे.
यापूर्वी वीरेन मर्चंट यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहित होते. पण, आता त्यांची मुलगी अंबानी कुटुंबातील सून होणार असल्याने, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना लागली आहे. विशेष म्हणजे, वीरेन मर्चंट आणि मुकेश अंबानी जुने मित्र आहेत.
वीरेन मर्चंट हे एनकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आहेत. याशिवाय त्यांच्या नावावर अनेक कंपन्यादेखील आहेत. यामध्ये एन्कोर बिझनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, एनकोर नॅचरल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, ZYG फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, साई दर्शन बिझनेस सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एनकोर पॉलीफ्रॅक प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, वीरेन मर्चंट यांची एकूण संपत्ती 755 कोटी रुपये आहे.
वीरेन मर्चंट यांनी त्यांची पत्नी शैला मर्चंटसोबत 2002 मध्ये एन्कोर हेल्थकेअरची स्थापना केली. शैला मर्चंट एनकोर हेल्थकेअर व्यतिरिक्त अनेक कंपन्यांमध्ये संचालक आहेत. यामध्ये अथर्व इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, हवेली ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि स्वस्तिक एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, शैला मर्चंटची संपत्तीही 10 कोटींहून अधिक आहे.
राधिका मर्चंट आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करते. ती सध्या वीरेन मर्चंट यांच्या एन्कोर हेल्थकेअरमध्ये संचालक मंडळावर आहे. एनकोर हेल्थकेअर, ही फार्मा उद्योगातील जागतिक कॉन्ट्रॅक्ट उत्पादक कंपनी आहे. पण, अद्याप कंपनी भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झालेली नाही.
12 जुलै रोजी अनंत अंबानी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. 13 जुलै रोजी नवविवाहित जोडप्यासाठी शुभ आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 14 जुलै रोजी मंगल उत्सव किंवा भव्य विवाह स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.