१४६ रूपये कमी देऊनही मिळतोय दुप्पट डेटा, ५६ दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा कोणता आहे जबरदस्त प्रीपेड प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 02:39 PM2021-03-07T14:39:09+5:302021-03-07T14:50:29+5:30

सध्या सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणत आहेत नव्या ऑफर्स

सध्या भारतात दूरसंचार क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू आहे. दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्सही आणत आहेत.

दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन-आयडियानं आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवे प्लॅन्स बाजारात आणले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये कंपनीनं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवे प्लॅन्स किंवा आधीच्या प्लॅन्समध्ये काही अधिक बेनिफिट्स देण्यास सुरूवात केली आहे.

याव्यतिरिक्त कंपनी आपल्या अनेक प्लॅन्ससोबत ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शनही देत आहे.

कंपनीच्या या अनेक प्लॅन्समध्ये आपण कोणता प्लॅन विकत घ्यावा हे अनेकदा ग्राहकांना समजतही नाही.

परंतु आज असे काही प्लॅन्स पाहू ज्यात अधिक डेटाही मिळतो आणि अधिक व्हॅलिडिटीही मिळते. याची किंमत ५९५ रुपये आणि ४४९ रूपये इतकी आहे. पाहूया नक्की यात काय आहे फरक.

व्होडाफोन-आयडियाच्या ५९५ रूपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा देण्यात येतो. याप्रकारे ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा वापरण्यास मिळतो.

याव्यतिरिक्त अन्य सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस अशाही सुविधा या प्लॅनसोबत मिळतात.

याशिवाय ग्राहकांना विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies and TV Classic अशा सुविधाही देण्यात येतात. यामध्ये विशेष म्हणजे ZEE5 चं एका वर्षाचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

याशिवाय कंपनीकडे ४४९ रूपयांचा ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचाही एक प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज ४ जीबी डेटा देण्यात येतो.

यामध्ये ग्राहकांना एकूण २२४ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनसोबतही ग्राहांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधाही मिळते.

याशिवाय विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies & TV Classic चंही अॅक्सेस देण्यात येतं. परंतु या प्लॅनसोबत ग्राहकांना ZEE5 ची मेंबरशीप मिळत नाही.

दोन्ही प्लॅन्समध्ये एकसमानच व्हॅलिडिटी आहे. तसंच दोन्ही प्लॅन्समध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही सारखीच आहे.

डेटाबद्दल सांगायचं झआलं तर ४४९ रूपयंच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ५९५ रूपयांच्या तुलनेत दुप्पट डेटा मिळतो.

याशिवाय १४६ रूपयांचा खर्चही कमी येतो. अशातच तुम्हाला ZEE5 चं सबस्क्रिप्शन जास्त कामी येणार नसेल तर तुम्हाला ४४९ रूपयांचा प्लॅन जास्त फायदेशीर ठरू शकतो.