vodafone idea 801 vs 699 prepaid plan with 84 days validity check data movies and other benifits
१०२ रूपये कमी देऊनही मिळतेय अधिक व्हॅलिडिटी आणि डेटा; पाहा Vodafone-Idea चा जबरदस्त प्लॅन By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 04:22 PM2021-03-31T16:22:34+5:302021-03-31T16:29:46+5:30Join usJoin usNext कमी पैशातही मिळतेय ८४ दिवसांची अधिक व्हॅलिडिटी आणि डेटा सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही नवे रिचार्ज प्लॅन्स किंवा अन्य योजना घेऊन येत असतात. परंतु अशा परिस्थिती ग्राहकांना प्लॅन निवडणं कठीण होतं. दरम्यान, आपण अनेक कंपन्यांच्या प्लॅन्सची यापूर्वीही तुलना केली आहे. आज व्होडाफोन आयडिया या कंपनीच्या काही प्रीपेड प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया. यामध्ये ग्राहकांना १०२ रूपये कमी देऊनही ८४ दिवसांची व्हॅलिडिटी आणि अधिक डेटा मिळतो. जर तुम्ही व्होडाफोन आयडियाचे ग्राहक असाल आणि तुम्ही ८४ दिवसांचे प्लॅन पाहत असाल तर तुमची नजर नक्कीच ८०१ रूपये आणि ६९९ रूपयांच्या प्लॅनवर गेली असेल. हे दोन्ही प्लॅन्स ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीवाले आहेत. तसंच यासोबत अनलिमिटेड कॉलिंगचा लाभही मिळतो. परंतु या प्लॅन्ससोबत मिळणारा डेटा आणि अन्य काही बाबींमध्ये फरक आहे. व्होडाफोन आयडियाच्या ६९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये सर्वच नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसंच यासोबत ८४ दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज ४ जीबी डेटा मिळतो. याप्रकारे यामध्ये एकूण ३३६ जीबी डेटा मिळतो. यामध्ये फ्री नाईट डेटा, विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies & TV Classic चं अॅक्सेसही मिळतं. जर तुम्हाला Disney + Hotstar ची मेंबरशिप कामी येणार नसेल तर तुम्ही ६९९ रूपयांचा प्लॅनही घेऊ शकतात. तसंच यामध्ये दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. यामध्ये ४८ जीबी अतिरिक्त डेटाही देण्यात येतो. अशाप्रकारे यात एकूण ३०० जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही देण्यात येते. याशिवाय या प्लॅन्समध्ये नाईट डेटा, विकेंड डेटा रोलओव्हरही मिळतं. यासह कंपनी ग्राहकांना Vi Movies & TV Classic च्या अॅक्सेससह Disney + Hotstar चं एका वर्षाचं सबस्क्रिप्शनही देते. दोन्ही प्लॅन्सचा विचार केला तर यात व्हॅलिडिटी तितकीच आहे आणि अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएसही तितकेच देण्यात येतात. परंतु ८०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चं सबस्क्रिप्शन देण्यात येतं. तर ६९९ च्या प्लॅनमध्ये तुम्हाला कमी पैसे देऊनही अधिक डेटा देण्यात येतो. जर तुम्हाला Disney + Hotstar ची मेंबरशिप कामी येणार नसेल तर तुम्ही ६९९ रूपयांचा प्लॅनही घेऊ शकतात.टॅग्स :व्होडाफोनआयडियास्मार्टफोनइंटरनेटVodafoneIdeaSmartphoneInternet