Jio, Airtel ला टक्कर देण्यासाठी Vodafone Idea नं आणले चार नवे प्लॅन्स; जाणून घ्या बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 05:26 PM2021-12-16T17:26:55+5:302021-12-16T17:37:53+5:30

हे प्लॅन्स कंपनीच्या वेबसाइटवर आणि अॅपवर लाइव्ह झाले आहेत. म्हणजेच आतापासून यूजर्स या प्लान्सचा फायदा घेऊ शकतात.

Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी Vodafone Idea (Vi)ने चार नवे प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. हे प्लॅन्स कंपनीच्या वेबसाइटवर आणि अॅपवर लाइव्ह झाले आहेत. म्हणजेच आतापासून यूजर्स या प्लान्सचा फायदा घेऊ शकतात.

Vodafone Idea ने 155 रुपये, 239 रुपये, 666 रुपये आणि 699 रुपयांचे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत.

या प्लॅन्सवर अनेक बेनिफिट्स आहेत. 250 पेक्षा कमी प्लॅन घेणार्‍या यूजर्सना आता 155 आणि 239 रुपयांचा पर्याय असेल.

टेलिकॉम टॉकने यासंदर्भात वृत्त दिले आहे. टेरिफ हाइकनंतर पॉप्युलर लो-एंड वाले प्लान्सदेखील महाग झाले होते. यामुळे युजर्सना फारच कमी पर्याय उपलब्ध होते. Vodafone Idea च्या 155 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 1GB डेटा आणि 300 SMS देखील मिळतात.

Vodafone Idea चा 239 रुपयांचा प्रीपेड प्लॅनही 24 दिवसांच्या वैधतेसह आहे. यात यूजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सोबतच 1GB डेटा आणि रोजचे 100 SMS देण्यात आले आहेत.

Vodafone Idea चा पुढचा नवा प्लॅन 666 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 77 दिवसांच्या वैधतेसह अमर्याद कॉलिंग, डेली 1.5GB डेटा आणि डेली 100 SMS दिले जातात.

याच बरोबर, 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights ऑफर देखील दिल्या जातात. यात यूजर्सना Vi Movies आणि TV VIP चाही फ्री अॅक्सेसही मिळतो.

Vodafone Idea चा अखेरचा नवा प्लॅन 699 रुपयांचा आहे. त्याची वैधता 56 दिवसांची आहे. यात यूजर्सना रोज 3GB डेटा, अमर्याद व्हॉईस कॉल आणि डेली 100 एसएमएस दिले जातात. या प्लॅनमध्ये 666 रुपयांच्या प्लॅनचे सर्व फायदे उपलब्ध आहेत.