Vodafone-Idea नं लाँच केली प्रिमिअम VOD सर्व्हिस; आता पाहू शकाल तुमच्या आवडत्या मुव्हीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:08 PM2021-02-23T12:08:32+5:302021-02-23T12:13:29+5:30

Vodafone-Idea : याद्वारे ग्राहकांना घेता येणार आपल्या आवडत्या मुव्हीचा आनंद

Vodafone Idea नं सोमवारी Vi मुव्हीज आणि टीव्ही अॅपवर प्रिमिअम व्हिडीओ ऑन डिमांड सर्व्हिस ही सेवा लाँच करण्याची घोषणा केली. यासाठी कंपनीनं हंगामा या कंपनीसोबत करार केला आहे.

Vodafone Idea ही कंपनी आपली ओटीटी प्लॅटफॉर्मवरील स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोनाच्या महासाथीनंतर ग्राहकांचं मनोरंजनाचं साधन बदलत चाललं आहे. आता ग्राहक महासाथीच्या काळात आपल्या घरी बसून या सेवांचा लाभ घेऊ इच्छितात असं Vodafone Idea नं म्हटलं.

Vi मुव्हीज आणि टीव्हीवर व्ह्यू मॉडेल आपल्या मनोरंजनाच्या साधनांची व्याप्ती वाढवत आहे, असं कंपनीनं म्हटलं.

सध्या ग्राहकांना आपल्या रिचार्ज किंवा पोस्टपेड प्लॅननुसार या सेवेचा लाभ कोणत्याही अतिरिक्त किंमतीविना घेता येणार आहे.

तसंच ग्राहकांना ज्या भाषेत हवं असेल त्या भाषेत यावर ग्राहकांना प्रिमिअम कंटेन्ट पाहायला मिळेल.

Vodafone Idea आणि हंगामा यांच्यादरम्य़ान करण्यात आलेल्या कराराचं ध्येय डिजिटल इकोसिस्टमची वाढ करणं आणि टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांना प्रिमिअम चित्रपटांचा अॅक्सेस देणं हे असल्याचं कंपनीनं म्हटलं.

या सेवेअंतर्गत ज्या मुव्हीज ग्राहकांसाठी उपलब्ध केल्या जातील त्यामध्ये Tenet, Joker, Birds of Prey, SCOOB, Aquaman यांसारख्या हॉलिवूड मुव्हीजचा समावेश आहे.

अर्थव्यवस्था आणि मनोरंजन व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यानंतर नव्या कंटेन्टचे मॉडल आता समोर येत आहे. याच्या सहाय्यानं ग्राहकांना ठराविक किंमतीत कंटेन्ट पाहता येत आहे, अशी प्रतिक्रिया VIL चे चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनिश खोसला यांनी दिली.

VIL या सेगमेंटच्या ग्राोथसाठी हंगामा डिजिटलसारख्या पार्टनर्ससोबत काम करण्यास तयार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.