Vodafone Idea नं लाँच केला १२८ रूपयांचा प्लॅन, २८ दिवसांच्या वैधतेसह मिळणार बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 09:31 PM2021-06-28T21:31:34+5:302021-06-28T21:38:08+5:30

Telecom Companies In India : सध्या अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन ऑफर्स घेऊन येत आहेत.

सध्या एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या कंपन्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या ऑफर्स घेऊन येत आहे. व्होडाफोन आयडियानं आपल्या ग्राहकांना कमी किंमतीत अधिक फायदा मिळवून देण्यासाठी एक प्लॅन लाँच केला आहे.

व्होडाफोन आयडियानं १२८ रूपयांचा एक प्लॅन लाँच केला असून यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात येत आहेत. तसंच हा प्लॅन कॉलिंग बेनिफिट्ससहदेखील येतो.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना १० लोकल नाईट मिनिट्स देण्यात येत आहे. तसंच याशिवाय ग्राहकांना लोकल आणि नॅशनल कॉल्ससाठी २.५ पैसे प्रति सेकंदाचा चार्ज द्यावा लागणार आहे.

व्होडाफोन आयडियाच्या १२८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना लोकल एसएमएससाठी १ रूपया, एसटीडीसाठी १.५ रूपये आणि आयएसडी एसएमएससाठी ५ रूपये द्यावे लागतील.

या प्लॅनसोबत मिळणारे नाईट मिनिट्स हे रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत वापरता येतील. सध्या प्लॅन काही निवडक सर्कल्समध्येच उपलब्ध आहे. तसंच या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे.

सध्या या प्लॅनचा फायदा मुंबई, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश (पूर्व), उत्तर प्रदेश (पश्चिम) या ठिकाणी उपलब्ध आहे. लवकरच हा प्लॅन अन्य सर्कल्समध्येही लाँच केला जाऊ शकतो.

व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि डेटासारख्या सुविधा देण्यात येत नाही. परंतु ज्या लोकांना आपला नंबर सुरू ठेवायचा आहे आणि केवळ इनकमिंक कॉल्स अपेक्षित आहे अशा लोकांसाठी हा प्लॅन आणण्यात आला आहे.

व्होडाफोन आयडियाप्रमाणेच एअरटेलनंदेखील रविवारी १२८ रूपयांचा एक प्लॅन लाँच केला आहे. याची वैधतादेखील २८ दिवसांची आहे.

व्होडाफोन आयडियाप्रमाणेच एअरटेलनंदेखील रविवारी १२८ रूपयांचा एक प्लॅन लाँच केला आहे. याची वैधतादेखील २८ दिवसांची आहे.

एअरटेलच्या प्लॅनमध्येही ग्राहकांना व्हॉईस कॉलिंग, टॉकटाईम किंवा एसएमएससारखी सुविधा देण्यात येत नाही. यातही ग्राहकांना लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी २.५ पैसे प्रति सेकंद चार्ज द्यावा लागेल.