Vi चा स्वस्तात मस्त प्लान! कमी किमतीत अनलिमिटेड डेटा, कॉलिंगसह OTT फायदे; एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 08:30 PM2022-02-13T20:30:21+5:302022-02-13T20:37:38+5:30

Vi चा हा दमदार प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स...

जिओच्या एन्ट्रीनंतर टेलिकॉम क्षेत्रात सुरू झालेली तीव्र चुरस आणि स्पर्धा अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच ग्राहक टिकावे, यासाठी कंपन्यांकडून अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात.

या स्पर्धेत सरकारी कंपनी असलेली बीएसएनएलही मागे नाही. जिओच्या प्रवेशानंतर सुरू झालेल्या स्पर्धेमुळे व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांनी Vi नावाची नवीन कंपनी सुरू केली. या Vi ने आपल्या ग्राहकांसाठी अनेकविध प्लान आणले आहेत.

तुमचा डेटा काम संपण्यापूर्वी संपला किंवा इंटरनेट वापरत असताना, तुमचा डेटा संपण्याची भीती तुम्हाला वाटत असेल, तर Vi चा हा स्वस्त प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

Vi च्या या खास पोस्टपेड प्लानमध्ये युजर्सना खरोखर अनलिमिटेड डेटा मिळतो आणि तो तुमच्या ब्रॉडबँड प्लानपेक्षा महागही नाही. Vi चा हा दमदार पोस्टपेड प्लान सर्वोत्तम प्लान्सपैकी एक असल्याचे सांगितले जाते.

Vi चा ६९९ रुपयांचा प्लान हा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लानपैकी एक आहे. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. विशेष बाब म्हणजे, या प्लानमध्ये डेटावर कोणतीही FUP मर्यादा नाही, म्हणजेच तुम्हाला पाहिजे तेवढा डेटा वापरू शकता.

Vi च्या या प्लानमध्ये संपूर्ण महिन्यासाठी फक्त १०० एसएमएस मिळतात. जर एसएमएस तुमच्यासाठी महत्त्वाचे नसतील आणि त्याऐवजी अधिक डेटा ही तुमची प्राथमिकता असेल, तर हा प्लान तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो.

Vi च्या या प्लानमध्ये काही ओव्हर-द-टॉप (OTT) फायदे देखील समाविष्ट आहेत. जसे की Amazon Prime चे मोफत एक वर्षाचे सबस्क्रिप्शन, ज्याची किंमत साधारणपणे १,४९९ रुपये आहे. याशिवाय, युजर्सना डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन सुद्धा मोफत मिळते.

याशिवाय, Vi च्या या प्लानसोबत Vi च्या स्वतःच्या OTT प्लॅटफॉर्म Vi Movies आणि TV वापरायला मिळू शकतात. ही कंपनीची एकमेव योजना नाही जी युजर्सना खरोखर अनलिमिटेड डेटा ऑफर करते. इतर सर्व प्लान्स REDX श्रेणी अंतर्गत येतात आणि त्यांची किंमत दरमहा किमान १,००० रुपयांपेक्षा जास्त आहे.

Vi कडे अनेक प्लान्स आहेत, परंतु त्या सर्वांपैकी, ६९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन हा सर्वात परवडणारा आहे, जो प्रत्यक्षात अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. Vi ची REDX पोस्टपेड योजना वापरण्याचे वेगळे फायदे आहेत. युजर्सना मिळू शकणार्‍या फायद्यांची संख्या देशातील इतर कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरने ऑफर केलेल्या फायद्यांपेक्षा जास्त आहे.