Wadia group rebrands GoAir as GoFirst in run up to its IPO investment money
GoAir नं IPO साठी केला अर्ज; ३६०० कोटी रूपये जमवण्याची तयारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 04:29 PM2021-05-14T16:29:18+5:302021-05-14T16:34:20+5:30Join usJoin usNext GoAir IPO : मिळणार कमाईची संधी. कंपनीनं केलं रिब्रँडिंग. वाडिया समुगाची विमान कंपनी GoAir नं आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीनं सेबीकडे अर्जही दाखल केला आहे. कंपनीनं १३ मे रोजी GoAir चं Go First या नावानं रिब्रँडिंग केलं होतं. विमान कंपनीचं रिब्रँडिंग हे या IPO आणण्याच्या तयारीचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठं नुकसान सोसावं लागत आहे. GoAir ची सुरूवात २००५ मध्ये करण्यात आली होती. कंपनीच्या ताफ्यात ५० पेक्षा अधिक विमानं आहेत. याची स्पर्धक कंपनी IndiGO चा व्यवसाय एका वर्षानंतर सुरू करण्यात आला होता. परंतु त्यांच्या ताफ्यात GoAir पेक्षा पाच पट अधिक विमानं आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनमुळे गेल्या १४ महिन्यांपासून विमान कंपन्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. CNBC-TV18 नं मार्च महिन्यात GoAir एअर हे यावर्षी एप्रिल महिन्यात ड्राफ्ट हेरिंग प्रॉस्पेक्टर (DRHP) दाखल करू शकतं असं म्हटलं होचतं. GoAir नं नियामक सेबीकडे जो DRHP दाखल केल्या आहे त्यामध्ये Go First ड्रेटमार्क आणि लोगोच्या रजिस्ट्रेशनसाठीही अर्ज केला आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी यापूर्वी ब्रँड नेम आणि ट्रेडमार्कचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. नव्या ब्रँड अंतर्गत आम्ही संपूर्ण व्यवस्थापनात बदल केला आहे. नव्या ब्रँडमुळे आम्ही उत्तम प्रकारे ग्राहकांना जोडू शकतो असंही GoAir नं म्हटलं आहे. कंपनीनं आपल्या महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याच्या योजेनेसाठी निधी जमा करण्यासाठी एक इनिशिअल शेअर सेलची तयारी केल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. अल्ट्रा-लो-कॉस्टच्या (ULCC) रूपात Go First आपल्या ताफ्यात सिंगल एअरक्राफ्टप्रमाणे संचालन करेल. सध्या एव्हिएशन मार्केटमध्ये Go Air चा गिस्सा ७.८ टक्के इतका होता. पहिल्यांदा जून २०१४ मध्ये या विमान कंपनीचा एव्हिएशन मार्केटमध्ये हिस्सा १० टक्क्यांच्या पुढे गेला होता. काही बाबी सोडल्यान तर गेल्या वर्षी कोरोनाची महासाथ येईपर्यंत हा हिस्सा १० टक्क्यांच्या जवळपासच होता. टॅग्स :गो-एअरभारतपैसागुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंगGoAirIndiaMONEYInvestmentIPO