6 वर्षाच्या चिमुकल्याने केलं वॉलमार्टसोबत डील, कमाई ऐकाल तर थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 15:25 IST2018-08-07T15:02:24+5:302018-08-07T15:25:57+5:30

यू-ट्यूबवर प्रसिद्ध झालेला 6 वर्षाचा रयान आता स्टोर बिझनेसमध्ये पाऊल ठेवणार आहे. रयानने वॉलमार्टसोबत एक डील केलं आहे. हा सहा वर्षाचा चिमुकला लाखो रुपये कसे कमावतो आणि हे डील नेमकं काय ते जाणून घेऊया...
रयान पॉकेट डॉट वॉचसोबत काम करतो. रयानला आवडणारी खेळणी आणि कपडे रयान्स वर्ल्ड नावाने विकले जातात.
रयानने वॉलमार्टसोबत एक डील केलं आहे. त्यानूसार रयान्स वर्ल्डची खेळणी वॉलमार्टचे 2500 अमेरिकी स्टोर आणि वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
रयान यू-ट्यूबवर वेगवेगळ्या खेळण्यांचा रिव्ह्यू देणारे व्हिडीओ पोस्ट करत असतो. गेल्या वर्षी त्याने यामधून 11 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 75 कोटींची कमाई केली होती.
यू-ट्यूब स्टार रयानचं टॉयज रिव्ह्यू असं एक चॅनल असून त्याचे 15 मिलियन सबस्क्रायबर आहेत. तसेच गेल्या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या यू-ट्यूबरमध्ये रयान आठव्या स्थानी होता.
रयानच्या एका व्हिडीओला हजारो नाही तर करोडो लाईक्स येत असतात. रयान तीन वर्षाचा असल्यापासून त्याचे वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात झाली.
रयानचा पहिला यूट्यूब व्हिडीओ हा मार्च 2015 मध्ये आला होता. यामध्ये तीन वर्षाचा रयान एका लेगो बॉक्ससोबत खेळताना दिसला होता.
पॉकेट वॉच या वेबसाईटनेही रयानसोबत एक डील केलं आहे. यामध्ये ही वेबसाईट रयानचे व्हिडीओ वापरून खेळणी आणि कपडे लहान मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करते.