गृहकर्ज घ्यायचेय? तुमच्या 'या' गोष्टींवर ठरते कर्ज मंजुरी By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 12:08 PM 2019-06-05T12:08:06+5:30 2019-06-05T12:11:01+5:30
स्वप्नातले घर घेण्यासाठी जास्तीत जास्त गृहकर्ज काढले जाते. मात्र, अनेकजणांना बँकांकडून कर्ज नाकारले जाते. बँका आणि वित्त संस्था ग्राहकांना कर्ज देताना अनेक चाळण्यांतून मंजुरी किंवा नामंजुरी देतात.
यामध्ये व्याज दर, प्रोसेसिंग फी, क्रेडिट अमाऊंट, री पेमेंट पिरिएड, ईएमआय, रिपेमेंटमध्ये विलंब आदी कारणे पडताळून पाहिली जातात. जर तुम्ही गृहकर्ज काढणार असाल तर काही बाबींकडे जरूर लक्ष द्यायला हवे.
क्रेडीट स्कोर कोणत्याही व्यक्तीचा क्रेडीट स्कोर त्याच्या कर्ज प्रकरणाला प्रभावित करतो. हा स्कोअर काही विशिष्ट कंपन्यांकडूनच ठरविला जातो. यामध्ये पाहिले जाते की, तुम्ही आधी कर्ज घेतलेले आहे की नाही.
तसेच क्रेडीट कार्डचा वापर कशाप्रकारे केला आहे. रिपेमेंटचा इतिहास, बिलांवेळी केलेल्या परताव्यावरून हे ठरविले जाते.
उत्पन्न किती कोणत्याही व्यक्तीच्या विविध उत्पन्नाची पडताळणी केली जाते. तसेच यातून किती बचत केली जाते याचा लेखाजोखा मांडला जातो.
जर एख्याद्याचे उत्पन्न 1 लाख रुपये आहे, यामध्ये 50 हजार रुपये पगार आणि भाडे 30 हजार तसेच ठेवींवरील व्याज 20 हजार येत असेल तर त्यानुसार मासिक ईएमआय ठरविला जातो. शिवाय कर्जाची रक्कमही यावरच ठरते.
वय गृह कर्ज घेताना त्या व्यक्तीचे वय खूप महत्वाचे असते. जर एखादी व्यक्ती निवृत्त होण्याच्या जवळपास असेल तर त्याला कर्ज मिळणे कठीण जाते.
चालू कर्ज चालू असलेले कर्ज किंवा परताव्यामध्ये झालेला विलंब किंवा डिफॉल्टरमध्ये नाव असणे कर्ज मंजुरीसाठी त्रासाचे ठरू शकते. तसेच देन किंवा तीन कर्ज सुरु असल्यास म्हणजेच शैक्षणिक, वाहन कर्ज आणि क्रेडीट कार्ड लोन घेतलेले असल्यास त्याचे कर्ज मंजुर होण्यास समस्या होऊ शकते.