Broadband कनेक्शन घ्यायचंय? मग थांबा!; त्यापूर्वी पाहून घ्या या बेस्ट सेलर्स प्लॅन्सची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 06:27 PM2022-04-02T18:27:24+5:302022-04-02T18:40:38+5:30

Best Sellers Broadband Plans : जर तुम्ही देखील ब्रॉडबँड घेण्याचा विचार करत असाल परंतु तुमच्यासाठी कोणता प्लॅन योग्य असेल या गोंधळात असाल तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट सेलिंग प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.

Best Sellers Broadband Plans : भारतातील इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स (ISPs) त्यांच्या ग्राहकांना विविध प्रकारचे ब्रॉडबँड प्लॅन्स ऑफर करतात. जर तुम्ही देखील ब्रॉडबँड घेण्याचा विचार करत असाल परंतु तुमच्यासाठी कोणता प्लॅन योग्य असेल या गोंधळात असाल तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट सेलिंग प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. हे प्लॅन्स सहसा वेबसाइट्सवर बेस्ट सेलिंग किंवा पॉप्युलर प्लॅन्स म्हणून लिस्ट केले जातात. पाहूया Jio, Airtel आणि BSNL चे बेस्ट सेलिंग प्लॅन्स कोणते आहेत.

Jio ने ऑफर केलेला सर्वात लोकप्रिय ब्रॉडबँड प्लॅन OTT सबस्क्रिप्शनसह येतो. JioFiber 30 दिवसांच्या वैधतेसाठी 999 रुपयांच्या किमतीत 150 Mbps इंटरनेट स्पीड ऑफर करते. या प्लॅनची ​​FUP मर्यादा 3300Gb किंवा 3.3TB आहे.

युझर्सना या प्लॅनसोबत 150 Mbps चा सिमेट्रिकल अपलोड आणि डाऊनलोड स्पीड देण्यात येतो. याशिवा. वेबसाईटवर हा प्लॅन बेस्ट सेलिंग प्लॅन म्हणून लिस्ट करण्यात आलाय. तसंच यात 15OTT प्लॅटफॉर्म्सचं सबस्क्रिप्शन देण्यात येतं. यात अॅमेझॉन प्राईम, डिज्नी+ हॉटस्टार, इरॉस नाऊ आणि अन्य अॅप्सचं वार्षिक सबस्क्रिप्शन मिळतं.

BSNL भारत आपल्या ग्राहकांना फायबर कनेक्शनद्वारे अनेक प्लॅन्स ऑफर करते. परंतु कंपनीचा सर्वात लोकप्रिय प्लॅन 100 Mbps चा आहे. कंपनीचा सुपरस्टार प्रीमियम-1 ब्रॉडबँड प्लॅन 749 रुपयांमध्ये 100 Mbps इंटरनेट स्पीड ऑफर करतो.

या प्लॅनची ​​FUP मर्यादा 1000GB आहे. हा प्लॅन Sony Liv Premium, Zee5 Premium आणि इतरांसह काही OTT सबस्क्रिप्शन्ससह येतो. तसेच, ग्राहकांना त्यांच्या पहिल्या महिन्याच्या भाड्यावर बिलावर 500 पर्यंत 90 टक्के सूट घेता येते.

एअरटेल त्याच्या Xstream फायबर कनेक्शनद्वारे अनेक प्लॅन्स ऑफर करते. परंतु कंपनीचा बेस्टसेलर 'एंटरटेनमेंट' पॅक आहे जो 999 रुपयांच्या किमतीत 200 Mbps इंटरनेट स्पीड ऑफर करतो. या प्लॅनची ​​FUP मर्यादा 3300Gb किंवा 3.3TB आहे.

एअरटेल त्याच्या Xstream फायबर कनेक्शनद्वारे अनेक प्लॅन्स ऑफर करते. परंतु कंपनीचा बेस्टसेलर 'एंटरटेनमेंट' पॅक आहे जो 999 रुपयांच्या किमतीत 200 Mbps इंटरनेट स्पीड ऑफर करतो. या प्लॅनची ​​FUP मर्यादा 3300Gb किंवा 3.3TB आहे.