Want to save income taxe See where you can invest
कर वाचवायचाय?, पाहा कुठे करू शकता गुंतवणूक ! By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 09:46 AM2022-07-12T09:46:02+5:302022-07-12T09:53:21+5:30Join usJoin usNext पाहा कोणत्या आहेत त्या योजना आणि कशात करू शकता गुंतवणूक, रिटायरमेंटला सुरक्षित आणि तणावमुक्त करण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना अशा गुंतवणूक योजना आवश्यक असतात, ज्या केवळ नियमितपणे रिस्क न घेता परतावा देण्यासह गुंतवणूक आणि परताव्यावरील प्राप्तिकरही वाचवतात. अशा नेमक्या योजना कोणत्या ते पाहू... किती मिळते कर सवलत? - ६० ते ८० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ३ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट मिळते, तर ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा वार्षिक ५ लाख रुपये आहे. प्राप्तिकर सवलतीसह नियमित उत्पन्नासाठी नागरिक या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. दरम्यान, गुंतवणूकीसाठी काही पर्यायही आहेत. करमुक्त रोखे : करमुक्त रोखे हे महागाईवर मात करण्याबरोबरच नियमित उत्पन्नासाठी एक चांगला पर्याय आहे. एएए क्रेडिट रेटिंग असलेल्या, उच्च तरलता आणि उच्च उत्पन्न-ते मॅच्युरिटी असलेल्या करमुक्त बाँडमध्ये वृद्धांनी गुंतवणूक करावी. १० वर्षांच्या रोख्यांचा सरासरी वार्षिक परतावा ८.५ % आहे, जो एफडीच्या तुलनेत खूप जास्त आहे. टॅक्स सेव्हिंग एफडी : ज्येष्ठ नागरिक अधिक सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्नासाठी ५ वर्षांच्या कर बचत एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये वार्षिक १.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते. परतावा करमुक्त आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ज्येष्ठ नागरिक बचत योजना सरकारतर्फे चालवली जाणारी योजना असून, यात बँक अथवा पोस्टामध्ये खाते उघडले जाते. ही योजना ६० पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. योजना सुरू केल्यानंतर ५ वर्षांनी रक्कम मॅच्युअर होते. त्याला आणखी ३ वर्षांनी वाढवता येते. याच्यावर वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये ८० सी अंतर्गत कर सवलत मिळत. मात्र जर वार्षिक व्याज ५० हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर टीडीएस कापला जातो. पीएम वय वंदन योजना : ही योजना एलआयसीला जोडण्यात आली आहे. यात भारत सरकार अनुदान देते. ज्येष्ठ नागरिकांना योजनेत १० वर्षांपर्यंत एका ठराविक दराने पेन्शन मिळते. पीएमव्हीव्हीवायसाठी ७.७५ टक्के व्याज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात.टॅग्स :इन्कम टॅक्सज्येष्ठ नागरिकIncome TaxSenior Citizen