३१ ते ४६ टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त रिटर्न, मार्चमध्ये कमाई करून देणारे टॉप-१० शेअर्स कोणते?
By जयदीप दाभोळकर | Updated: March 31, 2025 12:29 IST2025-03-31T12:13:56+5:302025-03-31T12:29:49+5:30
March Top-10 Shares: गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स ४२१६ अंकांनी म्हणजेच ५.७६ टक्क्यांनी वधारला आहे. या काळात निफ्टी ५०० च्या १० शेअर्सनं ३२ ते ४६ टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा दिलाय.

March Top-10 Shares: गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स ४२१६ अंकांनी म्हणजेच ५.७६ टक्क्यांनी वधारला आहे. तर निफ्टी ५० मध्ये १३९४ अंकांची म्हणजेच ६.३० टक्क्यांची वाढ दिसून आली. या काळात निफ्टी ५०० च्या १० शेअर्सनं ३२ ते ४६ टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा दिलाय. या टॉप-१० शेअर्समध्ये पीटीसी इंडस्ट्रीज, झेन टेक्नॉलॉजी, जेएसडब्ल्यू होल्डिंग्स अशा अनेक शेअर्सचा समावेश यांचा समावेश आहे. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स.
पीटीसी इंडस्ट्रीज : मार्चमध्ये पीटीसी इंडस्ट्रीजच्या प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना ४७४० रुपयांचा परतावा मिळाला. या कालावधीत हा शेअर ६४.४५ टक्क्यांनी वधारून १४,९४५ रुपयांवर पोहोचलाय.
झेन टेक्नॉलॉजीज : अँटी ड्रोन बनवणाऱ्या झेन टेक या डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये मार्चमध्ये बरीच वाढ झाली. कंपनीचे शेअर्स ४१.४५ टक्क्यांच्या उसळीसह १४७९ रुपयांवर पोहोचलेत.
जेएसडब्ल्यू होल्डिंग्स : निफ्टी ५०० शेअर्सच्या टॉप-१० च्या यादीत जेएसडब्ल्यू होल्डिंग्स तिसऱ्या स्थानावर आहे. मार्चमध्ये त्यात ४० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली. आता हा शेअर २२९८६ रुपयांवर पोहोचलाय.
ट्रान्सफॉर्मर अँड रेक्टिफायर इंडिया : ट्रान्सफॉर्मर आणि रेक्टिफायर इंडियाचा शेअर शुक्रवारी ५३६.२० रुपयांवर बंद झाला. मार्चमध्ये त्यात ३९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
चेन्नई पेट्रो: चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये महिन्याभरात ३६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या तेजीमुळे हा शेअर ६१५.१० रुपयांवर पोहोचलाय.
एचएएल : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे शेअर्सही मार्चमध्ये टॉप-१० मध्ये आहेत. त्यांनी एका महिन्यात ३५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. शुक्रवारी एचएएल ४१७७ रुपयांवर बंद झाला आणि मार्चमध्ये त्याने प्रत्येक शेअरवर १०८९ रुपयांचा परतावा दिलाय.
एचईजी : या शेअरने एका महिन्यात जवळपास ३५% परतावा दिला आहे. शुक्रवारी तो ४८२.८५ रुपयांवर बंद झाला होता.
गार्डन रिच शिपबिल्डर्स : हा शेअरही मार्चमध्ये जवळपास ३४ टक्क्यांच्या वाढीसह टॉप-१० निफ्टी ५०० मध्ये सामील झाला आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सचा शेअर १४८६ रुपयांवर पोहोचला आहे.
अदानी ट्रान्समिशन : अदानी ट्रान्समिशनही मार्चमध्ये टॉपर असल्याचं सिद्ध झालंय. सुमारे ३४ टक्के दमदार परतावा देत तो ८७२ रुपयांपर्यंत पोहोचला.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन : १०५९ रुपयांवर पोहोचलेल्या ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या शेअरनं मार्चमध्ये ३२ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)