what do you say Family savings doubled in five years Read how
काय म्हणता? पाच वर्षांत दुप्पट झाली कौटुंबिक बचत! कशी ते वाचा...अन् उत्पन्न किती वाढणार जाणून घ्या.. By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 11:34 AM2022-08-25T11:34:04+5:302022-08-25T11:48:36+5:30Join usJoin usNext २०२१ पर्यंत मागील ५ वर्षांत देशातील कौटुंबिक बचत वाढून दुप्पट झाली आहे. २०१५-१६ मध्ये १५ लाख कोटी असलेली कौटुंबिक बचत २०२०-२१ मध्ये वाढून ३१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. ‘एसबीआय इॅकोरॅप’ अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. खर्च किती वाढणार? ‘मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट वेल्थ’च्या ताज्या अहवालानुसार, २०३० पर्यंत देशातील कौटुंबिक बचत ४ पट व सुख-सुविधांवरील खर्च १० पट वाढेल. उत्पन्न किती वाढणार? ‘मोतीलाल ओसवाल प्राइवेट वेल्थ’चे एमडी आणि सीईओ आशिष शंकर यांनी सांगितले की, या दशकात देश निरंतर वृद्धीच्या मार्गावर अग्रेसर राहील. उत्पन्नात वाढ होईल. २०२५ पर्यंत अतिश्रीमंतांची संख्या ११,१९८ होईल. २०२० मध्ये ही संख्या केवळ ६,८८४ होती. २४० कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्यांना अतिश्रीमंत म्हटले जाते.वृद्धीदर किती? एसबीआय इकोरॅपच्या अहवालानुसार, चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर १५.७ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. जानेवारी-मार्चच्या तिमाहीत तो अवघा ४.१ टक्के होता. सेवा क्षेत्रातील सुधारणा हे या वाढीमागील मुख्य कारण असेल.महागाई कमी होईल? भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, पुढील दोन वर्षांत किरकोळ महागाईचा दर घटून ४% होईल. जुलैमध्ये महागाई ६.७% होती. महागाईत जी काही वाढ व्हायची होती, ती झालेली आहे. आता किमती घसरायला सुरुवात झाली आहे. परिस्थितीवर रिझर्व्ह बँकेची नजर आहे. महागाई कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जातील. अशी झाली कौटुंबिक बचतीत वाढ २०१५-१६ साली १४.९६, २०१६-१७ मध्ये १६.१५, २०१७-१८ या वर्षात २०.५६, तर २०१८-१९ मध्ये २२.६४; पुढे २०१९-२० यावर्षात २३.९९ आणि २०२०-२१ ३१.०९ इतकी बचतीत वाढ झाली आहे. (आकडे लाख कोटी रुपयांत. स्रोत : एसबीआय इकोरॅप)मागणी वाढणार तज्ज्ञांच्या मते, आगामी काही वर्षांत मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वाढती कौटुंबिक बचत हे त्यामागील मुख्य कारण असेल. त्याचवेळी सुख-सुविधांवरील (डिस्क्रेशनरी) खर्चही वाढेल. महागाई कमी झाल्यामुळेही मागणी वाढण्यास मदत होईल.टॅग्स :व्यवसायbusiness