मुंबईपेक्षा लहान असलेल्या 'या' देशाचा गोल्डन व्हिसा सर्वात महाग; एवढ्या पैशात कंपनी सुरू होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:47 IST2025-03-07T11:36:51+5:302025-03-07T11:47:46+5:30

Golden Visa : जगात असे अनेक देश आहेत, जे श्रीमंत व्यक्तींना 'गोल्डन व्हिसा' देतात. तुमचा जन्म त्या देशात झाला नसला तरीही तुम्ही त्या देशाचे नागरिक बनू शकता. फक्त तुमच्याकडे पाण्यासारखा पैसा हवा. या व्यवस्थेचा फायदा दोन्ही पक्षांना होतो. एकीकडे, देशाला विविध विकास प्रकल्पांसाठी पैसा मिळतो, तर व्हिसाधारकाला त्या देशातील नागरिकांना उपलब्ध सेवा आणि विशेषाधिकार मिळतात.

विशेष बाब म्हणजे गोल्डन व्हिसाधारकाला हे फायदे मिळवण्यासाठी व्हिसा देणाऱ्या देशात राहण्याचीही गरज नाही. हा व्हिसा सहसा गुंतवणूकदारांना दिला जातो. याचा अर्थ, तुम्ही एखाद्या देशात ठराविक किमान रक्कम गुंतवली तर तुम्हाला गोल्ड व्हिसा मिळेल. आज अशाच काही देशांबद्दल जाणून घेऊ, ज्यांचा गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात.

माल्टाच्या गोल्डन व्हिसाची किंमत तब्बल ५४ कोटी रुपये आहे. या रकमेत तुम्ही नवीन स्टार्टअप कंपनी सुरू करू शकता. हा व्हिसा १९० डेस्टिनेशन्ससाठी व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल ट्रॅव्हल ऑफर करतो. माल्टाचा गोल्डन व्हिसाद्वारे युरोपियन युनियन देशांना तसेच जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शाळा आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश आणि पूर्ण नागरिकत्व मिळते.

इटलीचा गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी तुम्हाला सुमारे २.३४ कोटी रुपये गुंतवावे लागतील. हा व्हिसा मिळाल्यास तुम्हाला इटलीमध्ये वास्तव्य, काम करण्याचा आणि अभ्यास करण्याचा तसेच युरोपच्या शेंजेन परिसरात व्हिसा-मुक्त प्रवास करू शकता.

यूएईमध्ये किमान २ दशलक्ष AED (अंदाजे ४.७५ कोटी) गुंतवणुकीवर गोल्डन व्हिसा मिळतो. व्हिसा धारकाला UAE च्या ७ पैकी कोणत्याही अमीरातमध्ये राहण्याचा अधिकार मिळतो. तुम्हाला तुमचा जोडीदार किंवा कोणत्याही वयोगटातील अविवाहित मुलांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय व्हिसामध्ये सेवा दिली जाते.

ग्रीस विशेष रिअल इस्टेटमध्ये सुमारे २.३४ कोटी रुपये गुंतवणुकीवर नागरिकत्व देतो. हा व्हिसा युरोपच्या शेंजेन परिसरात व्हिसा मुक्त प्रवास करण्याची अनुमती देतो. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ग्रीसमध्ये राहण्याचीही गरज नाही. हा गोल्डन व्हिसा व्हिसाधारकाला ७ वर्षांच्या वास्तव्यानंतर नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची परवानगी देतो.

सायप्रस देशाचा गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी तुम्हाला किमान २.८२ कोटी रुपये मोजावे लागतील. युरोपमधील व्हिसा मुक्त प्रवासात प्रवेश मिळवण्याचा हा एक स्वस्त मार्ग समजला जातो. हा व्हिसा सायप्रसमध्ये राहण्याचा आणि अभ्यास करण्याचा अधिकार देतो. परंतु, व्हिसा धारकांना देशात राहण्याची आवश्यकता नाही. मात्र, त्याला दर दोन वर्षांनी एकदा हा प्रवास करावा लागणार आहे.