काय आहे पोस्ट ऑफिसची 'नॅशनल पेन्शन योजना'; कमी दिवसात गुंतवणूक करुन करोडपती होऊ शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 04:21 PM2024-08-21T16:21:18+5:302024-08-21T16:28:43+5:30

खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी एनपीएस ही योजना निवृत्तीनंतर फायद्याची आहे. यामध्ये थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर ५० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते.

खासगी क्षेत्रात नोकरी करतात त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. पण जे सरकारी नोकरी करतात. त्यांना पेन्शन मिळते. यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सरकार पेन्शन योजना लाँच करत असते. यापैकी एक म्हणजे NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना.

खाजगी नोकऱ्या करणाऱ्यांसाठी एनपीएस हा त्यांच्या म्हातारपणी सोबती आहे. यामध्ये थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात ५० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. यो योजनेत कशी गुंतवणूक करावी यासाठी काही टिप्स आहेत. त्या आपण जाणून घेऊ.

ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. याचा नफा तुम्हाला निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात नियमितपणे मिळतो. ही एक प्रकारची कंट्रीब्यूटरी पेन्शन योजना आहे जी सरकार चालवते. ज्याचा उद्देश देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक मदत करणे हा आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना २००४ मध्ये सुरू झाली. यापूर्वी या योजनेचे लाभार्थी फक्त सरकारी कर्मचारी होते. पण २००९ पासून ते सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुले करण्यात आले.

NPS योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या नावाने किंवा तुमच्या पत्नीच्या नावाने खाते उघडू शकता. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम २५० रुपये आहे. कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान आहे. तो या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. याशिवाय NPS खात्यात मासिक किंवा वार्षिक गुंतवणूक करण्याची सुविधा आहे.

याशिवाय तुम्ही २ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट घेऊ शकता. कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान आहे. त्याचा फायदा तो घेऊ शकतो. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन NPS खाते उघडू शकता. त्यांच्या खात्याच्या मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदार त्यांच्या खात्यातून ६० टक्के पैसे काढू शकतात. यावर कोणताही कर आकारला जाणार नाही.

NPS मध्ये दोन प्रकारची खाती आहेत. टियर-1 आणि टियर-2. टियर-1 मधून, ६० वर्षांनंतरच पैसे काढावे लागतात, तर टियर-2 खाते बचत खात्यासारखे काम करते, तिथून तुम्ही तुमच्या गरजेनुसार पैसे काढू शकता.

तुम्ही दर महिन्याला ५,००० रुपये गुंतवल्यास तुम्ही लखपती व्हाल. तुम्ही ही गुंतवणूक ३० वर्षे चालू ठेवली तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर ६० वर्षांपर्यंत १० टक्के परतावा मिळेल.

६० वर्षांच्या वयानंतर तुमच्या NPS खात्यातील एकूण रक्कम १.१२ कोटी रुपये होईल. नियमांनुसार, तुम्ही ६० वर्षांचे झाल्यावर तुम्हाला ४५ लाख रुपये रोख मिळतील. याशिवाय तुम्हाला दरमहा ४५ हजार रुपये पेन्शन मिळेल.