What is the formula to fight inflation Learn how common people can plan
महागाईचा सामना करण्याचा फाॅर्म्युला काय? सर्वसामान्यांनी कसं नियोजन करावं जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 08:33 AM2022-11-09T08:33:45+5:302022-11-09T08:37:56+5:30Join usJoin usNext वाढती महागाई आणि घटते उत्पन्न खर्च वाढतो, शिवाय यामुळे बचत कमी होते. महागाईला तोंड देण्यासाठी खर्च कमी करून बचत करणे आवश्यक आहे. त्यासाठी ५०:३०:२० हा नियम लावल्यास लाभ होईल. जाणकारांच्या मते, महागाई २ ते ५ टक्के या सामान्य स्तरापेक्षा जेव्हा जास्त होते, तेव्हा हा नियम आदर्श आहे. सध्या देशात किरकोळ महागाईचा दर ७ टक्क्यांपेक्षा अधिक झालेला आहे.काय आहे हे सूत्र ? कर दिल्यानंतर जे उत्पन्न उरेल त्यातला ५० टक्के हिस्सा आवश्यक वस्तूंवर खर्च व्हावा. ३० टक्के हिस्सा आपल्या इच्छापूर्तीसाठी तर कमीत कमी २० टक्के हिस्सा बचतीच्या स्वरूपात गुंतवायला हवा. रेपो रेटमधील वाढीमुळे ईएमआयसुद्धा वाढले आहेत. अशा प्रसंगी इतर खर्च कमी करून २० टक्क्यांपेक्षा अधिक बचत करणे आवश्यक आहे. ५०:३०:२० चे सूत्र पाळणे कठीण आहे, मात्र अशक्य अजिबात नाही. हे सूत्र निश्चितच लाभदायक ठरेल.समभागांत गुंतवणूक करताना व्यवसाय पाहा महागाईमुळे वस्तूंच्या किमती वाढून काही उत्पादनांची विक्री घटते. अशा कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूक करणे तोट्याचे ठरू शकते. त्यामुळे गुंतवणुकीआधी कंपनीचा व्यवसाय पाहून घ्यायला हवा.वास्तव परतावा देणाऱ्या योजनांत गुंतवणूक करा वास्तव परतावा (रियल रिटर्न) देणाऱ्या योजनांत गुंतवणूक करा. बँकांच्या एफडी आणि त्यांसारख्या इतर योजनांत परतावा कमी मिळतो. म्युच्युअल फंडांच्या इक्विटी स्कीम्स आणि एसआयपीतील गुंतवणूक वाढवायला हवी. गुंतवणुकीवरील परतावा महागाईच्या दरापेक्षा अधिक हवा, तरच ती फायदेशीर ठरते.नकारात्मक परतावा टाळा महागाईच्या दरापेक्षा गुंतवणूक परतावा कमी असला तर त्यास नकारात्मक परतावा म्हणतात. समजा तुमच्या एफडीवर ५ टक्के परतावा मिळतो आणि महागाईचा दर ७ टक्के आहे. याचा अर्थ तुमच्या गुंतवणुकीवर २ टक्के परतावा कमी मिळत आहे. म्हणजे तुमचे निगेटिव्ह उत्पन्न २ टक्के आहे. ही स्थिती टाळायला हवी.अनावश्यक खर्च कमी करा अनावश्यक खर्चात शक्य होईल तितकी कपात करावी. थिएटरमध्ये सिनेमा पाहणे, रेस्टॉरेंटमध्ये डिनर, लॉन्ग ड्राइवला जाणे इत्यादी खर्च टाळायला हवेत. आपल्या बँकेचे अथवा क्रेडिट कार्डाचे स्टेटमेंट पाहत राहा. त्यातून अनावश्यक खर्च लक्षात येईल. टॅग्स :महागाईInflation