ज्युनियर सेल्स मॅनेजर राहिलेली अंबानींची सून राधिका मर्चंटची एकूण संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 03:22 PM2023-01-21T15:22:16+5:302023-01-21T15:38:50+5:30

भारत आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या घरी लवकरच लग्नाची सनई वाजणार आहे. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचं राधिका मर्चंटशी लग्न ठरलं आहे. अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात श्रीमंत कंपनी आहे.

अंबानींनी त्यांच्या तीन मुलांना कंपनीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. अनंत अंबानी यांच्याकडे तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायाची कमान देण्यात आलीय. अनंत अंबानी यांची होणारी बायको राधिका मर्चंट न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर आहे तर अनंत याने अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून शिक्षण घेतलंय.

राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात एका रिअल इस्टेट कंपनीत ज्युनियर सेल्स मॅनेजर म्हणून केली होती. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी लहानपणापासूनचे मित्र आहेत. २०१८ मध्ये दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता.

राधिका ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. व्यापारी कुटुंब गुजरातच्या कच्छ भागातील आहे. १८ डिसेंबर १९९४ रोजी जन्मलेल्या राधिका मर्चंटने न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंडिया फर्स्ट ऑर्गनायझेशनमध्ये इंटर्नशिप केली.

तिने इस्प्रवा या रिअल इस्टेट कंपनीत ज्युनिअर सेल्स मॅनेजर म्हणूनही काम केले. पण काही काळानंतर ती तिच्या कौटुंबिक व्यवसायात रुजू झाली. ती सध्या एन्कोर हेल्थकेअरमध्ये संचालक आहे. सध्या राधिका मर्चंटविषयी गुगलवर अनेकजण जाणून घेण्यास इच्छुक आहेत.

त्यात नेट वर्थ किती आहे? याची उत्सुकता अनेकांना आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका मर्चंट आलिशान आयुष्य जगते. ती डिझायनर कपडे घालते. तसेच, तिला महागड्या बॅग्सचाही शौक आहे. राधिका मर्चंट खूप स्टायलिश आहे.

तिला नृत्य, पोहणे आणि पुस्तके वाचण्याची आवड आहे. इंस्टाग्रामवर तिचे ६० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. राधिकाच्या वडिलांची एकूण संपत्ती ७५५ कोटी रुपये आहे. तर राधिकाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, ती सुमारे ८ ते १० कोटी रुपये आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा रोका गेल्या वर्षी २९ डिसेंबरला झाला होता. नुकतेच गुजराती रितीरिवाजांनुसार या दोघांनी साखरपुडा केले.

राधिका आणि अनंत काही महिन्यापूर्वीच चर्चेत आले होते. राधिकाने अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका मेहतासोबत ईशा अंबानीच्या एंगेजमेंटमध्ये परफॉर्म केले होते त्यावेळी चर्चेत आली होती. तेव्हापासून राधिका अंबानी कुटुंबाच्या सर्व फंक्शन्स आणि इव्हेंटमध्ये उपस्थित राहते.

हा फोटो काही दिवसापूर्वीचा आहे. राधिका मर्चंट या भावी सासरे मुकेश अंबानींसोबत तिरुपती बालाजीला गेले होते. अलीकडेच नीता अंबानी या देखील राधिकाच्या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या आणि दोघेही स्टेजवर एकत्र दिसले होते.