इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची सॅलरी किती? जाणून विश्वास बसणार नाही! मिळतात एवढ्या साऱ्या सुविधा By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 08:46 PM 2023-09-11T20:46:02+5:30 2023-09-11T21:07:53+5:30
चंद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर, चंद्रासंदर्भात विविध प्रकारची नवी माहितीही मिळाली आहे. ही संपूर्ण मोहीम ज्यांच्या मार्गदर्शनासाठी पार पडली, ते म्हणजे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ. गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रावर पोहोचून भारताने इतिहास रचला आणि जगात आपल्या देशाचा डंका वाजला. भारताने पाठविलेल्या चंद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलचे चंद्राच्या पृष्ठ भागावर यशस्वीपणे लँडिंग झाले आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला.
चंद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर, चंद्रासंदर्भात विविध प्रकारची नवी माहितीही मिळाली आहे. ही संपूर्ण मोहीम ज्यांच्या मार्गदर्शनासाठी पार पडली, ते म्हणजे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ. खरे तर, यानंतर, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची सॅली किती असावी? त्यांना कोण कोणत्या सुविधा मिळतात? हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा आहे. तर आज आम्ही आपल्याला यासंदर्भात माहिती देणार आहोत.
इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांची सॅलरी किती? - नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे, इस्रोच्या प्रमुखाची मासिक सॅलरी अडीच लाख रुपये महिना एवढी असते. महत्वाचे म्हणजे, इस्रो प्रमुखांना सॅलरी शिवाय राहण्यासाठी घर आणि वाहन आदिंची सुविधाही मिळते. एवढेच नाही, तर इस्रो प्रमुखांना एका आयएएस अथवा आयपीएसचा दर्जाही असतो. इस्रो प्रमुखांच्या सॅलरीसंदर्भात आरपीजी एंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयनका यांनी एक ट्विट देखील केले आहे.
मिळते वाय प्लस सुरक्षा - इस्रो प्रमुखांना वाय प्लस सुरक्षाही मिळते. केंद्र सरकारने एप्रिल 2022 मध्ये इस्रोचे प्रमुख श्रीधर परिकर सोमनाथ अर्थात एस सोमनाथ यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. या शिवाय ते जिथे कुठे असतील, त्यांच्या सुरक्षेत चोवीस तास 4 ते 6 सशस्त्र कमांडो देखील तैनात असतील.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अथवा इस्रो, ही देशातील एक प्रमुख संस्था आहे. त्याचे संपूर्ण प्रशासन अंतराळ विभागांतर्गत काम करते. हा विभाग थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येतो.
इस्रोमध्ये वैज्ञानिक, इंजिनिअर्स आदी काम करत असतात. त्यांची सॅलरी आणि भत्ता, यासंदर्भात सरकारने स्थापन केलेला वेतन आयोग निश्चित करत असतो.
7व्या वेतन आयोगानुसार, इस्रोच्या वैज्ञानकांना मिळणाऱ्या सॅलरीतही मोठा बदल झाला आहे. आता पे बँड आणि ग्रेड पे मिळून जी रक्कम होईल, ते बेसिक पे असेल. याशिवाय, इस्रोमध्ये काम करणाऱ्यांना DA मिळतो. यात वर्षातून दोन वेळा वाढ होते.
याशिवाय, इस्रोत काम करणाऱ्यांना HRA देखील मिळतो. हा बेसिक सॅलरीच्या 10 ते 30 टक्क्यांपर्यंत असतो. त्यांना ग्रेड पे आणि पोस्टिंगनुसार TA ही मिळतो. तसेच, ट्रान्सपोर्ट अलाउन्सवर DAही मिळतो.
महत्वाचे म्हणजे, येथील कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह मेडिकल सुविधाही मिळते, एवढेच नाही, तर घर बांधण्यासाठी अॅडव्हॉन्स, ग्रुप इंन्शुरन्स, सब्सिडी असलेले कँटीन आदी सुविधाही मिळते.