What will be expensive from budget?
अर्थसंकल्पातून काय होणार महाग ? By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 08:37 PM2018-02-01T20:37:59+5:302018-02-01T20:55:53+5:30Join usJoin usNext परदेशातून आयात केलेल्या गाड्या महाग होणार आहेत. गाड्यांमधील पार्टही महागणार असून, तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. महिलांसाठी असलेली सौंदर्यप्रसाधनांची साधनंही महागणार आहेत. अंधार दूर करण्यासाठी कँडल लाइट डिनरसाठी वापरण्यात येणा-या मेणबत्त्याही महागणार आहेत. घराला प्रकाशमान करणारे एलईडी बल्बही महागणार आहेत. मासे पकडण्यासाठी मच्छीमारांना उपयुक्त असलेलं मच्छीमारांचं जाळंही महागणार आहे. मोबाइल फोनवर तासनतास बोलणा-यांसाठी वाईट बातमी आहे, मोबाईल फोनवर बोलण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. माणसाला सतत जागतं ठेवणारं भिंतीवरचं घड्याळंही महाग होणार आहेत. घरातील जेवणाला बसण्यासाठी उपयुक्त ठरणारं डायनिंग टेबलसह फर्निचरही महागणार आहे. विदेशातून आयात केलेलं सोनंही महागणार आहे. सिगारेट पिणा-यांसाठी वाईट बातमी आहे, तंबाखू महागणार आहे. तुम्हाला आता हॉटेलमध्ये जेवणासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सामान्य माणसांसाठी नित्यपयोगी असलेली मोटारसायकलही महाग होणार आहे. फ्रीजच्या किमती वाढवल्यामुळे आता ठंड पाणीही महागणार आहे. टॅग्स :अर्थसंकल्प २०१८बजेट 2018 संक्षिप्तBudget 2018Budget 2018 Highlights