SIP Investment : केव्हा बनाल ₹१,२९,९०,५३८ चे मालक, समजणारही नाही; केवळ सुरू करावी लागेल ₹२००० ची SIP, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 10:40 AM 2024-09-05T10:40:55+5:30 2024-09-05T10:49:24+5:30
SIP Investment : पहिल्या पगारापासून आर्थिक नियोजन सुरू करा. जर तुम्ही रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी फक्त २००० रुपयांची एसआयपी सुरू केली तर तुम्ही स्वतःला करोडपती बनवाल. जाणून घेऊ कसं? आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. जर गुंतवणूकीतून तुम्हाला मोठी रक्कम जमा करायची असेल तर गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं गरजेचं आहे. गुंतवणूकीसाठी अनेक पर्याय उपसब्ध आहेत. पाहूया तुम्ही छोटी रक्कम गुंतवणूक कसा कोट्यवधींचा निधी उभा करू शकता.
केवळ निवृत्तीची चिंता करून चालणार नाही, आर्थिक नियोजन अगोदरच करावं लागेल. जर तुम्ही वेळीच फायनान्शिअल प्लॅनिंग सुरू केलं तर रिटायरमेंट फंड म्हणून कोणताही भार न पडता एक कोटींपेक्षा अधिक फंड जोडता येईल.
तुम्हाला नोकरी मिळताच फक्त २००० रुपयांची एसआयपी सुरू करावी लागेल. ही एवढी नाममात्र रक्कम आहे की, साधा पगार घेणारी व्यक्तीही ही गुंतवणूक सुरू करू शकते. वयाच्या २५ व्या वर्षीही एसआयपी सुरू केल्यास निवृत्ती दरम्यान तुम्हाला १ कोटींपेक्षा अधिक निधी मिळू शकतो.
जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी २००० रुपयांची एसआयपी सुरू केली आणि वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत ही गुंतवणूक सुरू ठेवली तर तुम्हाला एकूण ३५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. दीर्घ मुदतीत सरासरी एसआयपी परतावा १२ टक्के मिळतो. कधी कधी यापेक्षा ही जास्त असतो. परंतु येथे आपण केवळ सरासरी परताव्याची गणना करू.
जर तुम्ही सलग ३५ वर्षे एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात दरमहा २००० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही एकूण ८,४०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. परंतु ३५ वर्षांत १२ टक्के दरानं मिळणारं चक्रवाढ व्याज १ कोटी २१ लाख ५० हजार ५३८ रुपये असेल.
अशा प्रकारे ६० व्या वर्षी तुम्हाला गुंतवलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम मिळून एकूण १,२९,९०,५३८ रुपये मिळतील. जर तुम्हाला १४ टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला ६० व्या वर्षी २,२४,६४,९७२ रुपये मिळतील.
एसआयपीचा वापर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी केला जातो, जे बाजाराशी जोडलेले असतात, त्यामुळे ते जोखमीच्या अधीन असतात. बाजारात परताव्याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत एसआयपी म्युच्युअल फंडातही परताव्याची हमी देता येत नाही.
पण दीर्घ काळात एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्क्यांपर्यंत असतो, असं बहुतांश आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे. अनेकवेळा तो १५ ते २० टक्क्यांपर्यंतही असल्याचं दिसून आलंय. असा परतावा इतर कोणत्याही योजनेतून मिळत नाही. हेच कारण आहे की बाजारातील जोखीम असूनही गेल्या काही वर्षांत एसआयपीमध्ये लोकांचा कल लक्षणीय वाढला आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. एसआयपीतील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)