ATM मधून पैसे काढताना करा हे छोटंस काम, नेहमी सेफ राहील अकाऊंटमधील पैसा By बाळकृष्ण परब | Published: October 4, 2020 08:34 PM 2020-10-04T20:34:28+5:30 2020-10-04T20:53:54+5:30
कोरोनाकाळात फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. दररोज कुणाच्या ना कुणाच्या खात्यातून पैसे काढल्याच्या बातम्या येत असतात. अशा परिस्थितीत आज आपण एटीएम मशीनबाबतची अत्यंत महत्त्वाची बाब जाणून घेऊया. कोरोनाकाळात फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. दररोज कुणाच्या ना कुणाच्या खात्यातून पैसे काढल्याच्या बातम्या येत असतात. अशा परिस्थितीत आज आपण एटीएम मशीनबाबतची अत्यंत महत्त्वाची बाब जाणून घेऊया.
सामान्य माणसांचे बँकेमधील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँका आणि आरबीआयकडून सातत्याने पावले उचलण्यात येतात. हल्लीच रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड संबंधीचे नियम बदलले आहेत. मात्र या सर्वांमध्ये प्रत्येकाने स्वत: खबरदारी घेणे आवश्यक आहे. हो, एक छोट्याा लाइटच्या चुकीमुळे तुमचे बँक अकाऊंट रिकामी होऊ शकते. जाणून घेऊया याबाबत.
सामान्य माणसांचे बँकेमधील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँका आणि आरबीआयकडून सातत्याने पावले उचलण्यात येतात. हल्लीच रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड संबंधीचे नियम बदलले आहेत. मात्र या सर्वांमध्ये प्रत्येकाने स्वत: खबरदारी घेणे आवश्यक आहे. हो, एक छोट्याा लाइटच्या चुकीमुळे तुमचे बँक अकाऊंट रिकामी होऊ शकते. जाणून घेऊया याबाबत.
तुम्ही एटीएममध्ये गेल्यावर एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटला लक्षपूर्वक पाहा. जर तुम्हाला वाटले की एटीएम कार्ड स्लॉटमध्ये काही गडबड आहे किंवा स्लॉट सैल आहे किंवा काही इतर गडबड आहे तर अशावेळी त्याचा वापर करू नका.
कार्ड स्लॉटमध्ये कार्ड टाकताना तिथे पेटणाऱ्या लाइटवर लक्ष द्या. जर स्लॉटमध्ये हिवरी लाईट पेटत असेल तर तुमचं एटीएम सुरक्षित आहे.मात्र जर त्यामध्ये लाल लाइट पेटत असेल किंवा किंवा कुठलीही लाइट पेटत नसेल तर अशा एटीएमचा वापर करू नका. अशा एटीएममध्ये मोठी गडबड असू शकते. कारण एटीएम मशीन पूर्णपणे व्यवस्थित असल्यासच ग्रीन लाइट पेटू शकते.
हॅकर कुठल्याही युझरचा डेटा एटीम मशिनमध्ये कार्ड इन करण्याच्या स्लॉटमधून चोरतात. त्यासाठी हॅकर कार्ड स्लॉटमध्ये असे डिव्हाइस लावतात जे तुमच्या कार्डमधील संपूर्ण माहिती स्कॅन करून चोरते. त्यानंतर ब्लूटुथ किंवा अन्य वायरलेस डिव्हाइसच्या माध्यमातून तुमचा डेटा चोरी करते आणि बँक खाते रिकामी करू शकते.
त्यामुळे जर कधी तुम्हाला वाटले की, तुम्ही हॅकरच्या जाळ्यात फसला आहात आणि बँकसुद्धा बंद आहे, अशावेळी त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. कारण तिथे तुम्हाला हॅकरचे फिंगरप्रिंट मिळतील. तसेच तुम्ही तुमच्या जवळपास कुणाचे ब्लूटुथ कनेक्शन सुरू आहे का याचाही शोध घेऊ शकता. त्याद्वारे तुम्ही हॅकरपर्यंत पोहोचू शकता.
तुमच्या डेबिट कार्डचा पूर्ण अॅक्सेस घेण्यासाठी हॅकरकडे तुमचा पिन नंबर असणे गरजेचे आहे. हॅकर्स पिन नंबर कुठल्याही कॅमेऱ्याद्वारे ट्रॅक करू शकतात. त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा एटीएममध्ये पिन एंटर कराल तेव्हा दुसऱ्या हाताने पिन लपवून ठेवा. त्यामुळे त्याचा फोटो सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड होणार नाही.