महिलांना गुंतवणूकीवर कुठे मिळेल फायदाच फायदा? Samman सेव्हिंग स्कीम की FD स्कीम, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 08:51 IST2025-02-24T08:43:24+5:302025-02-24T08:51:24+5:30

Investment Scheme For Women: सरकार सातत्यानं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत असतं. सरकारनं महिलांसाठी गुंतवणूकीच्या अनेक योजना राबवल्या आहेत.

Investment Scheme For Women: सरकार सातत्यानं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत असतं. सरकारनं महिलांसाठी गुंतवणूकीच्या अनेक योजना राबवल्या आहेत. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) आणि बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) या सुरक्षित गुंतवणुकीच्या योजना आहेत. एमएसएससीची योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. जर तुम्ही महिला गुंतवणूकदार असाल तर किंवा जर तुमच्या घरात एखादी महिला गुंतवणूक करण्याचा विचार करत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एमएसएससी आणि बँक एफडीवर तुम्हाला कुठे जास्त व्याज मिळेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

महिलांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं महिला सन्मान बचत योजना सुरू केली आहे. ही योजना दोन वर्षांत मॅच्युअर होते. ही योजना ३१ मार्च २०२५ रोजी संपणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून गुंतवणुकीवर निश्चित व्याज दिलं जातंय. या योजनेअंतर्गत सरकारला वार्षिक ७.५ टक्के व्याज मिळतं. हे व्याज त्रैमासिक आधारावर चक्रवाढ व्याज म्हणून खात्यात जमा केलं जाईल आणि मॅच्युरिटीनंतर ते दिलं जाईल.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत १,००० रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. महिला सन्मान बचत योजना २ वर्षात मॅच्युअर होते. म्हणूनच आम्ही तुम्हाला देशातील प्रमुख बँकांकडून २ वर्षांच्या एफडीवर किती व्याज दिलं जातं याबाबत माहिती देत आहोत.

एसबीआय सध्या ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक ३% ते ७.१०% दरम्यान व्याज दर देत आहे. १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एसबीआय सामान्य नागरिकांसाठी ६.८०% व्याज देतं.

७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी एचडीएफसी वार्षिक ३% ते ७.३५% दरम्यान व्याज देत आहे आणि १८ महिने ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एचडीएफसी बँक सर्वसामान्यांसाठी ७.२५% व्याज देत आहे.

कॅनरा बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक ४% ते ७.२५% दरम्यान व्याज देतं. १ वर्षांपेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी कॅनरा बँक सर्वसामान्यांना ६.८५% व्याज देते.

बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदतीवर वार्षिक ३% ते ७.२५% पर्यंत व्याज देतं. यात १५ महिने ते २ वर्षांच्या मुदतीवर ७.२५% व्याज मिळते.

इंडसइंड बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक ३.५०% ते ७.९९% दरम्यान व्याज देते. बँक १ वर्ष ५ महिने ते १ वर्ष ६ महिने ते १ वर्ष ६ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर वार्षिक ७.९९% आणि १ वर्ष ६ महिने ते २ वर्षे मुदतीच्या एफडीवर वार्षिक ७.७५% व्याज दर देते.