जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ५ कंपन्या कोणत्या? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 22:59 IST2021-02-26T22:50:49+5:302021-02-26T22:59:30+5:30
जगात एकापेक्षा एक मोठ्या कंपन्या आहेत. ज्या एका मिनिटात कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. जगात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कंपन्या कोणत्या असतील बरं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आपण याची आज माहिती घेणार आहोत...

जगात दरमिनिटाला सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांची यादी ब्लूमबर्कने जाहीर केली आहे. यात अनेक बड्या कंपन्यांचा समावेश आहे. ब्लूमबर्गने दिलेली कमाईची आकडेवारी ही डिसेंबरच्या डॉलरच्या रेटनुसार आहे.
क्रमांक ५- Facebook
फेसबुक (Facebook) ही कंपनी दर मिनिटाला सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. फेसबुक दर मिनिटाला १ कोटी १० लाखांची कमाई करणारी कंपनी आहे.
क्रमांक ४- Microsoft
चौथ्या क्रमांकावर आहे सुप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनी. ही कंपनी दर मिनिटाला २ कोटी ५ लाखांची कमाई करते.
क्रमांक ३- Google
जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत Google तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुगल दर मिनिटाला २ कोटी ५५ कोटी रुपयांची कमाई करतं.
क्रमांक २- Apple
सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अमेरिकेची जगप्रसिद्ध अॅपल (Apple) कंपनी दुसऱ्या क्रमांवर आहे. अॅपल कंपनी दर मिनिटाला ३ कोटी ५८ कोटी रुपयांची कमाई करते.
क्रमांक १- Amazon
जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांमध्ये Amazon चा पहिला क्रमांक आहे. अॅमेझॉन कंपनी दर मिनिटाला तब्बल ५ कोटी ३३ लाखांची कमाई करते.