कोणती बँक देते सर्वात स्वस्त होम लोन? जाणून घ्या गृहकर्जांचे व्याजदर By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 12:53 PM 2024-09-07T12:53:43+5:30 2024-09-07T13:03:39+5:30
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्टमध्ये झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दराबाबत कोणताही बदल केलेला नाही. आपलं स्वताचं घर असावं हे सर्वांचं स्वप्न असतं. आपण आपल्या आयुष्याची कमाई आपलं नवीन घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी खर्च करतो. घर घेण्यासाठी आता देशातील बँकाही कमी व्याजदार गृहकर्ज देत असतात. प्रत्येक बँकांचे व्याजदर वेगळे असतात.
आरबीआयने ऑगस्टमध्ये झालेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.अजूनही व्याजदरांमध्ये कोणताही बदल न होऊनही, देशातील अनेक बँकांनी निधीवर आधारित कर्ज दरांमध्ये किरकोळ खर्च सुधारित केला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्जावर ९.१५% व्याजदर आकारत आहे. या व्याजदराने ७५ लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी घेता येते. यासाठी प्रत्येक महिन्याला ६७,७२५ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
HDFC बँक ९.४% व्याज दराने गृहकर्ज देत आहे. या व्याजदराने ७५ लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी घेता येते. यासाठी प्रत्येक महिन्याला ६८,८५० रुपयांचा EMI भरावा लागेल.
एचडीएफसी व्यतिरिक्त, येस बँक देखील ९.४% व्याज दराने गृहकर्ज देत आहे.
Axis आणि ICICI बँक ९% व्याज दराने गृहकर्ज देत आहेत. या व्याजदराने ७५ लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी घेता येते. यासाठी ॲक्सिस बँक दरमहा ६५,७५० रुपये ईएमआय आकारेल, तर आयसीआयसीआय बँक ६६,९७५ रुपये दरमहा ईएमआय आकारेल.
सध्या युनियन बँक ऑफ इंडिया सर्वात स्वस्त गृहकर्ज ऑफर करत आहे. बँक ८.३५% व्याज दराने गृहकर्ज देत आहे. या व्याजदराने ७५ लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी घेता येते. यासाठी प्रत्येक महिन्याला ६३,९०० रुपयांचा EMI भरावा लागेल.