महिला सन्मान सर्टिफिकेटमध्ये कोण करू शकतं गुंतवणूक, किती मिळणार व्याज? जाणून घ्या गुंतवणूकीचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 01:23 PM2023-02-09T13:23:53+5:302023-02-09T13:42:29+5:30

Mahila Saving Certificate: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात महिलांसाठी नवीन बचत योजना जाहीर केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय भाषणात महिलांसाठी नवीन बचत योजना जाहीर केली. अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अशी नवीन बचत योजना सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.

ही योजना महिलांसाठी मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांसाठी उपलब्ध असेल. यामध्ये महिला किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते, ज्यावर वार्षिक 7.5 टक्के व्याज दिले जाईल. यामध्ये आंशिक पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्राद्वारे, कोणत्याही महिला किंवा मुलीच्या नावे - महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खरेदी केले जाऊ शकते. याद्वारे त्यांच्या नावे पैसे गुंतवले जाऊ शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा 2 लाख रुपये आहे. गुंतवणूकदार या योजनेअंतर्गत 7.5 टक्के निश्चित व्याजदर मिळवू शकतात.

या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे ही एक वन टाईम योजना आहे. महिला गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ पुढील 2 वर्षांसाठी म्हणजेच 2025 पर्यंत घेता येणार आहे.

केंद्र सरकारद्वारे ही योजना चालवली जात आहे. तसंच या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना आंशिकरित्या पैसे काढण्याचा पर्यायही देण्यात आलाय. गरज भासल्यास गुंतवणूकदार यातून काही पैसे काढू शकतात.

व्याज कसे मोजले जाईल याबद्दल अधिक तपशील समोर आलेला नाही. यामध्ये कंपाऊंडिंग इंटरेस्ट दिला जाईल किंवा सिंपल इंटरेस्ट दिला जाईल याची माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या व्याजावर टीडीएस कापला जाईल की नाही याबद्दल कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.