मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 09:26 AM2024-09-25T09:26:25+5:302024-09-25T09:37:00+5:30

Dilip Piramal Vip Industries : कंपनीचं कामकाज ५० हून अधिक देशांमध्ये पसरलंय. भारतात त्यांचे ८,००० हून अधिक रिटेल स्टोअर्स आहेत.

भारतीय उद्योगपती दिलीप पिरामल हे व्हीआयपी इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत. ही भारतातील सर्वात मोठा लगेज ब्रँड आहे. कंपनीचं कामकाज ५० हून अधिक देशांमध्ये पसरलंय. भारतात त्यांचे ८,००० हून अधिक रिटेल स्टोअर्स आहेत. अनेक दशकांपासून भारतीयांसाठी हा विश्वासार्ह ट्रॅव्हल पार्टनर ब्रँड आहे.

अब्जाधीश कुटुंबातील असूनही दिलीप पीरामल यांनी कौटुंबिक व्यवसायात सामील होण्याऐवजी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी व्हीआयपीची ओळख करून दिली. पीरामल ग्रुपचे प्रमुख अजय पिरामल हे दिलीप पिरामल यांचे बंधू आहेत. अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांचा विवाह झालाय.

दिलीप पीरामल यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबईत झाला. दिलीप यांनी १९७० मध्ये सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी मिळवली.

कौटुंबिक व्यवसायापासून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली, जिथे ते १९७० मध्ये मोरारजी मिल्सचे संचालक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांची ब्लो प्लास्टच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. ही व्हीआयपीची मूळ कंपनी आहे.

भावांनी कौटुंबिक व्यवसाय हाती घेतल्यानंतर दिलीप पीरामल यांनी स्वत:चा मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ब्लो प्लास्टची निवड केली, ज्याला आपण आज व्हीआयपी म्हणून ओळखतो.

दिलीप पीरामल यांनी हा व्यवसाय नव्या उंचीवर नेला. त्यांनी व्हीआयपीला देशातील सर्वात मोठी लगेज कंपनी बनवलं. त्यांच्या कंपनीअंतर्गत कार्लटन, कॅप्राईज, अॅरिस्टोक्रॅट, स्कायबॅग्ज आणि अल्फा असे अनेक लोकप्रिय ब्रँड लाँच करण्यात आले. हे सर्व ब्रँड भारतात अत्यंत लोकप्रिय आहेत आणि बाजारपेठेवर राज्य करतात.

दिलीप पीरामल यांनी भारतात चार चाकं असलेल्या लगेज बॅग तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. त्याचा वापर सर्वप्रथम त्यांच्या स्कायबॅग्ज या ब्रँडमध्ये करण्यात आला होता. नाशिकच्या एका छोट्या मिलमधून सुरू झालेली व्हीआयपी इंडस्ट्रीज आज ६३६८ कोटींची कंपनी बनली आहे. ५० देशांमध्ये त्याचे ८००० रिटेल स्टोअर्स आणि रिटेल सेलर्स आहेत.