Radhika Merchant : मुकेश अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंट कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 05:47 PM2022-12-29T17:47:18+5:302022-12-29T18:06:47+5:30

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे फोटो समोर आले. चला जाणून घेऊया कोण आहे राधिका मर्चंट, ज्या लवकरच अंबानी कुटुंबाच्या धाकट्या सून होणार आहेत.

राधिका मर्चंट या अंबानी कुटुंबाच्या धाकट्या सून होणार आहेत. राधिका या एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ आणि व्हाईस-चेअरमन वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.

राधिका मर्चंट यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे आणि एओ पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहे.

राधिकाचे कुटुंब अंबानी कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखते आणि राधिका या देखील नीता अंबानींच्या खूप जवळ आहेत. अलीकडेच नीता अंबानी या देखील राधिकाच्या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या आणि दोघेही स्टेजवर एकत्र दिसले होते.

हा फोटो काही दिवसापूर्वीचा आहे. राधिका मर्चंट या भावी सासरे मुकेश अंबानींसोबत तिरुपती बालाजीला गेले होते.

राधीका यांना नृत्याची आवड आहे. या नृत्याचे आयोजन स्वतः अंबानी कुटुंबाने केले होते आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केले होते. यावेळी राधीकाने सहभाग घेतला होता.

राधिका आणि अनंत काही महिन्यापूर्वीच चर्चेत आले होते. राधिकाने अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका मेहतासोबत ईशा अंबानीच्या एंगेजमेंटमध्ये परफॉर्म केले होते त्यावेळी चर्चेत आली होती. तेव्हापासून राधिका अंबानी कुटुंबाच्या सर्व फंक्शन्स आणि इव्हेंटमध्ये उपस्थित राहते.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी लहानपणापासून दोघ एकमेकांना ओळखतात.

आज 29 डिसेंबर 2022 रोजी रिलायन्सचे संचालक परिमल नाथवानी यांनी अनंत आणि राधिकाला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. या ट्विटमध्ये 'दोघांची एंगेजमेंट झाली आहे आणि लवकरच लग्नही होणार आहे, असं सांगण्यात आले आहे.

अनंत आणि राधिकाची एंगेजमेंट मुंबईत झालेली नाही तर राजस्थानच्या नाथद्वाराच्या श्रीनाथजी मंदिरात झाली आहे.

परिमल नाथवानी यांनी शेअर केलेला राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा हा फोटो आहे. हा फोटो राधिका आणि अनंत यांच्या एंगेजमेंटचा आहे.