without uan number check pf balance easily and withdraw from pf account
UAN नंबर शिवाय 'या' सोप्या पद्धतीने चेक करा PF बॅलेन्स, खात्यातून पैसे काढनंही शक्य By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 13, 2020 08:52 PM2020-10-13T20:52:23+5:302020-10-13T21:07:06+5:30Join usJoin usNext अनेकदा यूएएन नंबर जनरेट न झाल्याने अथवा अनेक वेळा हा नंबर विसरल्याने कर्मचाऱ्यांना आपले पीएफ बॅलेन्स तपासणे अथवा पीएफ अकाउंटमधून पैसे काढन्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, यूएएन नंबर नसला तरीही कर्मचारी आपल्या ईपीएफ अकाउंटमधील पैसे चेक करू शकतात अथवा पैसे काढूही शकतात. यूएएन अर्थात यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हा एक 12 अंकी यूनिक नंबर असतो. हा नंबर ईपीएफ सदस्याला दिला जातो. हा एक परमनंट नंबर असतो. जाणून घेऊया यूएएन शिवाय कसा चेक करता येऊ शकतो ईपीएफ बॅलेन्स... स्टेप-1 - आपल्याला सर्वप्रथम epfindia.gov.inवर जाऊन लॉग-इन करावे लागेल. स्टेप-2 - आता "Click Here to Know your EPF Balanc" लिंकवर क्लिक करावे लागेल. स्टेप-3 - आता आपण epfoservices.in/epfo/ वर रीडायरेक्ट व्हाल. आता आपल्याला “Member Balance Information” टॅबवर क्लिक करावे लागेल. स्टेप-4 - आता आपल्याला आपले राज्य निवडावे लागेल आणि आपल्या ईपीएफओ ऑफिस लिंकवर क्लिक करावे लागेल. स्टेप-5 - आता आपल्याला आपला पीएफ अकाउंट नंबर, नाव आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकावा लागेल. स्टेप-6 - आता आपल्याला सबमिटवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला आपला पीएफ बॅलेन्स स्क्रीनवर दिसेल. यूएएन नंबर शिवाय पीएप अकाउंटवरून असे काढाल पैसे? - आपल्याकडे यूएएन नंबर नसेल, तर आपल्याला पीएफ अकाउंटवरून पैसे काढण्यासाठी एक पीएफ विथड्रॉ फॉर्म भरावा लागेल आणि तो स्थानिक पीएफ ऑफिसमध्ये जाऊन जमा करावा लागेल. यासाठी ईपीएफ सदस्याला इंटरनेटच्या माध्यमाने आधार-बेस्ड नवा क्लेम फॉर्म अथवा नॉन-आधार क्लेम फॉर्म डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म भरून आपण पीएफ अकाउंटमधून थोड्या प्रमाणावर अथवा संपूर्ण पैसे काढू शकता. जर कर्मचारी निवृत्त झाला असेल अथवा तो दोन महिन्यांपासून अधिक काळ बेरोजगार असेल तरच त्याला इपीएफ अकाउंटमधून संर्व पैसे काढता येतात. तसेच, जर एखादा ईपीएफ सदस्य एक महिना बेरोजगार रहिला तर त्याला पेंन्शन फंडातून आपल्या एकूण पीएफ पैशांमधून 75 टक्के पैसे काढता येतात.टॅग्स :कर्मचारीEmployee