Rohit Sharmaचं घर आहे जगातील ५० हायराईज टॉवरपैकी एकात; किती आहे किंमत, काय आहेत वैशिष्ट्ये By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 08:54 AM 2024-07-06T08:54:54+5:30 2024-07-06T09:07:12+5:30
Rohit Sharma Luxurious House : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या खेळासहच आलिशान घरासाठीही प्रसिद्ध आहे. त्याचं हे आलिशान घर मुंबईत आहे. Rohit Sharma Luxurious House : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या खेळासहच आलिशान घरासाठीही प्रसिद्ध आहे. मुंबईतील वरळी परिसरात त्यांचे आलिशान अपार्टमेंट आहे. तेथे तो पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत राहतो.
रोहितचं घर मुंबईतील वरळी भागातील आहुजा टॉवर्सच्या २९ व्या मजल्यावर आहे. आहुजा टॉवर्स ही अरबी समुद्राचं सुंदर दृश्य असलेली ५३ मजली इमारत आहे. रोहितने हे घर २०१५ मध्ये विकत घेतलं होतं. याच वर्षी त्याने रितिकासोबत साखरपुडाही केला होता.
त्याचं घर सहा हजार चौरस फुटांमध्ये पसरलेलं आहे. त्याची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे. यात चार बेडरूम आहेत. याशिवाय अनेक आलिशान सोयी-सुविधादेखील आहेत.
रोहितच्या अपार्टमेंटची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथून समुद्राचे २७० डिग्री दृश्य दिसतं. त्यानं घराचं इंटेरिअर अतिशय सुंदर केलेलं आहे. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ त्याचं घर असल्यानं व्यस्त वेळेत त्याचा प्रवास सोपा होतो. रोहितचा मेहुणा बंटी सजदेह आणि त्यांचे एंडोर्समेंट मॅनेज करणाऱ्या कंपनीचे प्रमुख यांनी, याच कारणामुळे त्याने ही प्रॉपर्टी निवडली असल्याचं यापूर्वी सांगितलं.
रोहितचा फ्लॅट ज्या आहुजा टॉवर्समध्ये आहे, ती काही सामान्य इमारत नाही. जगातील ५० सर्वोत्तम हायराईज इमारतींपैकी ही एक मानली जाते. न्यूयॉर्कस्थित विल्सन असोसिएट्स आणि सिंगापूरस्थित पी अँड टी ग्रुप सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी डिझाइन आणि आर्किटेक्चर विकसित केलं आहे.
या वास्तूला स्थापत्यकलेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हा इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचा एलईडी प्रमाणित गोल्ड रेटेड प्रकल्प आहे. आहुजा टॉवर्समध्ये सुविधांची कमतरता नाही. जकुझी, स्विमिंग पूल, मिनी थिएटर, स्पा, सिगार रूम, स्काय कॅफे आणि अगदी शेफ ऑन डिमांड अशा सुविधा आहेत. या सर्व गोष्टींमुळे ही इमारत मुंबईतील सर्वात पॉश इमारतींपैकी एक बनते.
रोहितच्या चार बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये एक भव्य लिव्हिंग रूम आहे. त्याच्या छताची उंची १३ फूट असून, मोकळ्या आणि हवेशीर जागेची आनंद मिळते. अपार्टमेंटमध्ये होम ऑटोमेशन सिस्टीम देखील आहे, ज्याच्या मदतीने रोहित आणि रितिका टच पॅनेल आणि व्हॉईस कमांडद्वारे आपल्या घरातील लाइटिंग आणि टेम्परेचर सारख्या गोष्टी नियंत्रित करू शकतात.
अपार्टमेंटमध्ये आलिशान बाल्कनीही आहे. लाकडी फर्निचरने सजवलेल्या बाल्कनीत रोहितला फिटनेस रुटीन करण्यासाठी पुरेशी जागा आहे. याची झलक तो अनेकदा इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. हे घर त्यांच्यासाठी केवळ विश्रांती घेण्याचे ठिकाण नाही तर काम करण्याची जागा देखील आहे. त्यात कामासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. अपार्टमेंटमधील वॉक-इन क्लोसेट ही आणखी एक खासियत आहे, जिथे बऱ्याच गोष्टी ठेवण्यासाठी जागा आहे.