सर्वाधिक पगार घेणारे नोकरशहा! एका मिनिटाच्या सॅलरीपुढे एखाद्याचं वार्षिक पॅकेजही कमी; इथंही भारतीयांचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:49 IST2025-01-13T13:21:03+5:302025-01-13T13:49:08+5:30

highest salaried ceo : पैसा कमवायचा असेल तर नोकरी नाही व्यवसाय करा, असा सल्ला नेहमी दिला जातो. मात्र, हे प्रत्येकवेळी सत्य नाही. कारण, खासगी क्षेत्रात काही नोकरदारांचे पगार वाचून तुम्हाला भोवळ येईल. एखाद्या मोठ्या कंपनीचा वार्षिक कमाई नसेल इतका पगार हे लोक महिन्याला घेत आहेत. आज आपण जगातील १० अशाच नोकरशहांची माहिती घेणार आहोत.

ब्रॉडकॉमचे सीईओ हॉक टन हे जगातील १० वे क्रमांकाचे श्रीमंत कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचा वार्षिक पगार २८८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच २४,८७,३१,२९,७६३ रुपये आहे.

या यादीत रॉबर्ट ए. कोटिक यांचे नाव देखील समाविष्ट आहे. ज्यांचे वार्षिक वेतन २९६.७ दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय रुपयात ही रक्कम २५,६१,८२,४४,१२० आहे.

भारतीय वंशाचे सत्या नडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत. सत्या नडेला यांचा वार्षिक पगार ३०९.४ दशलक्ष डॉलर्स आहे. ज्याचे भारतीय मुल्य २६,७१,५७,१५,३९० रुपये आहे.

जगातील सर्वात श्रीमंत सीईओपैकी एक असलेल्या मार्क बेनिऑफचे वार्षिक वेतन ३७,९३,४५,२२,४७० रुपये आहे. ते सेल्सफोर्स कंपनीच्या प्रमुख पदावर आहेत.

रिजेनेरॉनचे सीईओ लिओनार्ड शेफलर यांचा पगारही गलेलठ्ठ आहे. त्यांचा वार्षिक पगार ३९,१०,००,११,८९५ रुपये आहे.

या यादीत नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हास्टिंग्ज यांचाही नंबर येतो. त्यांचा वार्षिक पगार ३९,१६,३९,०४,५९२ रुपये आहे.

Nvidia चे CEO जेन्सन हुआंग यांचा वार्षिक पगार ४८,४३,६९,६४,४०० रुपये आहे. एकेकाळी कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांनी संपत्तीच्या बाबतीत इलॉन मस्क यांना मागे टाकले होते.

भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे जगातील सर्वात श्रीमंत CEO पैकी आहेत, ज्यांचे वार्षिक वेतन २८० दशलक्ष डॉलर्स (२४,१८,९६,३४,०००) आहे.

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक हे पगाराच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पगार घेणारे सीईओ आहेत. कुक यांचा वार्षिक पगार ७७० दशलक्ष डॉलर्स रुपये आहे. जे भारतीय चलनात ६६,५५,८१,७८,५५० रुपये होतो.

टेस्लाचे मालक इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत सीईओंच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्याचा वार्षिक पगार २३.५ अब्ज डॉलर (२०,२९,९३,०६,७९,१५० रुपये) आहे.