yes bank crisis anil ambani ilfs essel group have thousand crores npa
कुणी बुडवली येस बँक?, कोणामुळे अडकले खातेधारकांचे कोट्यवधी रुपये? By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 02:59 PM2020-03-07T14:59:03+5:302020-03-07T15:10:48+5:30Join usJoin usNext कधी काळी ३ लाख कोटींच्या ठेवींसह देशातली पाचव्या क्रमांकाची खासगी बँक असलेली येस बँक आता अडचणीत सापडली आहे. फारसा अर्थविचार न करता कोणालाही कितीही रकमेचं कर्ज देण्यासाठी येस बँक प्रसिद्ध होती. कर्जाची मागणी करणारी कंपनी कितीही तोट्यात असली, दिवाळखोर असली, तरीही येस बँकेकडून कर्ज पुरवठा केला जायचा. बँकेचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर नियमांचं फारसं पालन करायचे नाहीत, असं म्हटलं जातं. नियम, कायद्यांऐवजी ते संबंधांना जास्त महत्त्व द्यायचे. आयएल अँड एफएस, अनिल अंबानी समूह यांच्यासारख्यांना येस बँकेनं कर्ज दिली. कंपन्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता देण्यात आलेली कर्ज पुढे बुडाली. सीजी पॉवर, एस्सार पॉवर, वरदराज सिमेंट यांनी येस बँकेचे हजारो कोटी रुपये थकवले आहेत. बँकिंग क्षेत्रापासून शेअर बाजारापर्यंत सगळ्यांना धक्का देणाऱ्या आयएल अँड एफएसनं येस बँकेचे २,४४२ कोटी रुपये थकवले आहेत. हे कर्ज बुडित खात्यात गेलं आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहातल्या कित्येक कंपन्यांनी येस बँकेकडून कर्ज घेतली. या कंपन्यांनी येस बँकेचे १३ हजार कोटी रुपये थकवले आहेत. एस्सल समूहाकडे येस बँकेची ३,३०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. उद्योग समूहांनी, कंपन्यांनी कर्जाची परतफेड न केल्यानं येस बँक अडचणीत आली. त्यांनी रिझर्व्ह बँकेपासून ही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये येस बँकेनं बुडित खात्यात गेलेलं ६,३५५ कोटी रुपयांचं कर्ज रिझर्व्ह बँकेपासून लपवण्याचा प्रयत्न केला. यानंतर रिझर्व्ह बँकेनं कारवाईचा बडगा उगारला. २०१८ मध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना ३ महिन्यांसाठी पदावरुन दूर केलं. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईचा येस बँकेला शेअर बाजारात फटका बसला. त्यांच्या समभागांचं मूल्य ३० टक्क्यांनी घसरलं.टॅग्स :येस बँकअनिल अंबानीरिलायन्सYes BankAnil AmbaniReliance