शेअर मार्केटमध्ये गुतंवणूक नाही म्हणून बिनधास्त आहात, मग समजून घ्या तुम्हाला कसा बसतोय फटका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:33 IST2025-04-12T17:28:42+5:302025-04-12T17:33:36+5:30
Share market fall affect on your profit: शेअर बाजारातील गुंतवणुकीचे धोके लक्षात घेऊन अनेकजण यापासून दूर राहतात. पण, तुम्हाला माहिती नाही की तुम्ही भविष्यासाठी करत असलेल्या गुंतवणुकीचा थेट शेअर मार्केटशी कसा आहे संबंध आहे...

ट्रम्प टॅरिफमुळे जगभरातील बाजारात प्रचंड चढ-उतार होत आहे. जर तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार नसाल आणि तुमच्यावर या चढ-उताराचा परिणाम होणार नाही या विचारात तुम्ही असाल तर तुम्ही चुकत आहात. तुमच्यावर शेअर बाजाराचा काय परिणाम होईल जाणून घेऊया...
राष्ट्रीय पेन्शन योजनेचा नफा : शेअर बाजारातून मिळणाऱ्या परताव्याशी एनपीएसदेखील जोडलेले आहे. त्यातील ५० ते ५० टक्के भाग बाजारात गुंतविला जातो. त्यात घट झाली तर नफ्यावर मोठा परिणाम होतो.
रुपया कमजोर, महागाईत वाढ विदेशी गुंतवणूकदार बाजारातून बाहेर पडतात. रुपयाचे मूल्य घसरते. किमती वाढल्यामुळे महागाई वाढते.
भविष्य निर्वाह निधीवरही परिणाम : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना तिच्या वार्षिक निधीपैकी १५% हिस्सा शेअर बाजारात ईटीएफद्वारे शेअर बाजारात गुंतविते.
पीएफवरील व्याजदर हा त्यावरील कमाईवर अवलंबून असतो. जेव्हा शेअर बाजारात मोठी घसरण होते तेव्हा त्याचा परिणाम संघटनेच्या निधीवर होतो. यामुळे व्याज कमी मिळते.
अॅन्युइटी घेणाऱ्यांची पेन्शन : एनपीएस सदस्यांना निवृत्तीनंतर पेन्शन अॅन्युइटी योजना घेणे आवश्यक आहे. या कंपन्या बाजारात गुंतवणूक करतात.
बाजारातील घसरणीमुळे अॅन्युइटी फंड कमी होतो आणि त्यामुळे पेन्शनची रक्कमही कमी होते.