... तर तुम्हाला येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस, 'या' चुका कटाक्षाने टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:55 PM2024-07-10T12:55:46+5:302024-07-10T13:03:45+5:30

सध्या आयटी रिटर्न दाखल करण्याचा महिना सुरू आहे. अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. मुदत संपण्यास काही दिवस उरले असताना धावाधाव सुरू करतात. परंतु आयटीआर भरताना काही चुका टाळणं महत्त्वाचं असतं.

सध्या आयटी रिटर्न दाखल करण्याचा महिना सुरू आहे. अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. मुदत संपण्यास काही दिवस उरले असताना धावाधाव सुरू करतात. अशात वेबसाइट हँग होणं, लाइट जाणं असे प्रकार घडल्यास गोंधळ वाढतो. यामुळे आयटीआर दाखल करताना काही चुका होण्याची शक्यता असते. अशा चुका झाल्यास तुम्हाला आयकर खात्याची नोटीस येऊ शकते. त्यामुळे आयटीआर भरताना पुढील चुका कटाक्षानं टाळल्या पाहिजेत.

चुकीचा फॉर्म निवडणे - करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी उत्पन्नाच्या प्रकारानुसार वेगवेगळे फॉर्म दिलेले असतात. दिलेल्या सात फॉर्मपैकी योग्य फॉर्म न निवडल्यास नोटीस येते.

चुकीची माहिती भरणे - अर्ज भरताना पत्ता, पॅन क्रमांक, आधार क्रमांक चुकीचा भरला जातो. यात योग्य काळजी न घेतल्यास नोटीस पाठवली जाते

ब्लॉक अपुरे ठेवणे - अर्जामध्ये वेगवेगळ्या विभागात माहिती भरण्यासाठी ब्लॉक्स दिले जातात. हे रिकामे ठेवल्यास रिटर्न अपुरा मानला जातो.

माहिती न जुळणे - तुमचा अर्ज आणि फॉर्म २६ एएसमधील माहिती न जुळल्यास आयकर विभागाकडून विचारणा केली जाऊ शकते.

दाखल करण्यास उशीर - आयटीआर दाखल करण्यासाठी खात्यानं दिलेल्या मुदतीनंतर भरल्यास तो अवैध मानला जात असतो.

चुकीचा खाते क्रमांक - अनेकदा आयटीआर भरतेवेळी खातेदार त्यांचा बँकेचा खाते क्रमांक चुकीचा भरतात. त्यामुळे रिफंडमध्येही अडचणी येतात.

विदेशी संपत्ती, उत्पन्न - तुमची विदेशातील मालमत्ता, इतर गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न याची माहिती नीटपणे न दिल्यास विचारणा होऊ शकते.

मालमत्तेचा तपशील : आपली जमीन, घर आदी मालमत्तेची माहिती खात्याच्या सूचनांनुसार 'शेड्युल एएल'मध्ये देणे बंधनकारक असते. अन्यथा दाखल केलेले रिटर्न अपुरे मानले जाते.

मालमत्तेचा तपशील : आपली जमीन, घर आदी मालमत्तेची माहिती खात्याच्या सूचनांनुसार 'शेड्युल एएल'मध्ये देणं बंधनकारक असतं. अन्यथा दाखल केलेला रिटर्न अपुरा मानला जातो.

कपात दाव्यात चूक / भांडवली नफ्यात गफलत : आयकर कापात दावा करताना चूक झाल्यास त्याचा परिणाम एकूण करदायित्त्वावर होतो. अनेकदा दीर्घकालीन भांडवली नफा आणि अल्पकालीन भांडवली नफा यातील फरक न समजल्यानं अर्ज भरताना चूक होऊ शकते.