पैशांसाठी कुणासमोर हात पसरावे लागणार नाहीत, खात्यात शून्य रुपये असतानाही मिळेल मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 02:29 PM2021-12-23T14:29:05+5:302021-12-23T16:32:52+5:30

जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुम्ही बँकेच्या 'या' सुविधेचा लाभ घेऊन पैसे काढू शकता. या सुविधेद्वारे तुम्ही बँकेत पैसे नसतानाही मोठी रक्कम मिळवू शकता.

आयुष्यात संकटे सांगून येत नाहीत. अनेकवेळा आपत्कालीन परिस्थिती पैशांची गरज भासते. सहसा अशा परिस्थितीत लोक मित्र, नातेवाईकांकडून पैसे उधार घेतात. पण, आता तुम्हाला ते करण्याची गरज नाही. तुमचे बँक खाते असेल तर तुम्ही मोफत ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊन पैसे काढू शकता. बहुतेक लोकांना या विशेष योजनेबद्दल माहिती नसते. आम्ही तुम्हाला बँकांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची पैशांची गरज भागेल.

ओव्हरड्राफ्ट सुविधा ही अल्प मुदतीच्या कर्जासारखीच असते. ज्याद्वारे खातेदार त्याच्या खात्यात पैसे नसताना किंवा पूर्णपणे शून्य शिल्लक असतानाही त्याच्या खात्यातून पैसे काढू शकतो. जवळपास सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे. बहुतांश बँकांमध्ये ही सुविधा चालू खाते, पगार खाते किंवा मुदत ठेवीवर उपलब्ध आहे. काही बँकांमध्ये शेअर्स, बाँड्स, पगार, विमा पॉलिसी, घर, मालमत्ता यासारख्या गोष्टींवरही ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.

सहसा, बँक आपल्या ग्राहकांना संदेश किंवा ई-मेलद्वारे सूचित करत असते की ते ओव्हरड्राफ्टची सुविधा घेऊ शकतात. या ओव्हरड्राफ्टची मर्यादा बँकेने आधीच ठरवलेली असते. अचानक खर्च होत असताना सॅलरी ओव्हरड्राफ्टची ही सुविधा खूप उपयोगी पडते. जर तुमचा ईएमआय, एसआयपी किंवा कोणताही चेक संलग्न असेल तर तो बाऊन्स होण्याची शक्यता असते. मात्र ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ घेतल्यास ही कोंडी टाळता येईल.

आणीबाणीच्या वेळी रोख रकमेची गरज भासल्यास, तुम्ही इतर कर्जासाठी जसे अर्ज करता तसे बँकेत अर्ज करावा लागतो. ज्यांचा पगार आणि चालू खाते आहे त्यांना लवकर ओव्हरड्राफ्ट मिळतो. ओव्हरड्राफ्ट अंतर्गत तुम्हाला गरजेच्या वेळी बँकेकडून पैसे मिळतील, कारण हे फक्त एक कर्ज आहे जे तुम्हाला नंतर परत करावे लागेल आणि त्यावर व्याज देखील द्यावे लागेल.

ओव्हरड्राफ्टवर किती व्याज आकारले जाईल आणि रक्कम दिली जाईल, हे तुम्ही तारण म्हणून काय ठेवत आहात यावर अवलंबून आहे. ओव्हरड्राफ्टसाठी तुम्हाला बँकेसमोर काहीतरी तारण ठेवावे लागेल. जसे की मुदत ठेवी, रोख किंवा शेअर्स. त्यानुसार रोख रकमेची मर्यादा वाढवता किंवा कमी करता येते. उदाहरणार्थ, जर तुमची बँकेत 2 लाख रुपयांची एफडी असेल, तर तुम्हाला 1.50 लाख रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो. ही रक्कम शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचर्सच्या बाबतीत कमी-अधिक असू शकते.

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ संयुक्तपणे देखील घेता येतो. अशा स्थितीत पैसे भरण्याची जबाबदारी दोघांची असेल. दुसरीकडे, जर एक रक्कम भरण्यास सक्षम नसेल, तर दुसऱ्याला संपूर्ण रक्कम भरावी लागेल. तारण ठेवलेल्या वस्तूंवर धोका निर्माण होईल, जर तुम्ही ओव्हरड्राफ्ट भरण्यास सक्षम नसाल. अशा परिस्थितीत तुम्ही तारण ठेवलेल्या गोष्टींद्वारे त्याची परतफेड केली जाईल. परंतु जर ओव्हरड्राफ्ट केलेली रक्कम तारण ठेवलेल्या वस्तूंच्या मूल्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उर्वरित रक्कम भरावी लागेल.

साधारणपणे, बँका तुमच्या पगार खात्यावर ओव्हरड्राफ्ट देखील देतात. हे पगाराच्या 2 ते 3 पट असू शकते. या प्रकारच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी, तुमचे वेतन खाते त्याच बँकेत असले पाहिजे. ज्यातून तुम्हाला ओव्हरड्राफ्ट घ्यायचा आहे. उदाहरणार्थ, तुमचे SBI मध्ये पगार खाते असल्यास, ओव्हरड्राफ्टसाठी किमान 6 नियमित पगार खात्यांमध्ये क्रेडिट असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, जर तुमची एसबीआयमध्ये एफडी असेल तर तुम्ही त्यावर 5 कोटी रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट घेऊ शकता.