Is your Aadhaar Card real fake know simple step by step procedure
तुमचं Aadhaar Card खरं आहे की बनावट?; अशी पटवा ओळख By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 02:18 PM2021-08-24T14:18:34+5:302021-08-24T14:23:35+5:30Join usJoin usNext Aadhaar Card आहे महत्त्वाचं दस्तऐवज. सध्या अनेक कामांसाठी आधार कार्डाचा वापर करण्यात येतो. आजच्या काळात आधार कार्ड एक आवश्यक दस्तऐवज बनले आहे. सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे, जर तुमचे आधार कार्ड बनावट निघाले, तर तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. पण तुमचे आधार कार्ड खरे आहे की बनावट हे कसे जाणून घ्यावे? यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही तुमचे आधार कार्ड बरोबर आहे की नाही हे तुम्ही सहज पडताळून पाहू शकाल. सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या आधार सर्व्हिस या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही ''Verify an aadhaar number" या ऑप्शनवर क्लिक करा. त्या ठिकाणी देण्यात आलेला कॅप्चा आणि तुमचा आधार क्रमांक टाका. अखेरच्या स्टेपमध्ये "Proceed to Verify" यावर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या तुमचं आधार कार्ड खरं आहे की बनावट याची कल्पना येईल. जर तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालं तर तुमचं आधार खरं आहे आणि नाही झाल्यास तुम्हाला दुसरं आधार तयार करावं लागेल. जर तुम्हाला तुमच्या आधार संदर्भात कोणती तक्रार दाखल करायची असेल तर तीदेखील ऑनलाईन करू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम आधारच्या संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर About UIDAI या सेक्शनवर जा. त्या ठिकाणी तुम्हाला 'Grievances Redressal' हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. 'UIDAI Contact Centre' च्या आत 'File a Complaint' हा पर्याय दिसेल. त्यावर तुम्ही क्लिक करा. 'File a Complaint' या पर्यायावर गेल्यानंतर तुमच्याकडून अन्य प्रकारची माहिती मागितली जाईल. यामध्ये तुमचं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि अन्य माहितींचा समावेश असेल, .ही माहिती भरताना ती काळजीपूर्वक भरा. त्यानंतर Check Status वर जाऊन तुम्ही सर्व माहिती घेऊ शकाल.टॅग्स :आधार कार्डऑनलाइनभारतAdhar CardonlineIndia