NPS Scheme : तुमच्या पत्नीला मिळू शकतं ₹४४,७९३ चं मंथली पेन्शन; एकूण ₹१,११,९८,४७१ मिळणार, बेस्ट आहे 'ही' स्कीम By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:13 AM 2024-08-30T10:13:27+5:30 2024-08-30T10:20:26+5:30
NPS Scheme : जर तुमची पत्नी भविष्यात पैशांसाठी कोणावरही अवलंबून नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. यामध्ये तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम आणि पेन्शन मिळू शकते. जर तुमची पत्नी भविष्यात पैशांसाठी कोणावरही अवलंबून नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने न्यू पेन्शन सिस्टिम (एनपीएस) खातं उघडू शकता. एनपीएस खात्यात पत्नीला वयाच्या ६० व्या वर्षी एकरकमी रक्कम दिली जाईल.
याशिवाय तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे. हे तुमच्या पत्नीचं नियमित उत्पन्न असेल. एनपीएस खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दरमहा किती पेन्शन हवी हे तुम्ही स्वत: ठरवू शकता. वयाच्या ६० व्या वर्षी तुमच्या पत्नीला पैशांची कमतरताही भासणार नाही.
तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावानं नवीन पेन्शन सिस्टीम (नॅशनल पेन्शन स्कीम) खातं उघडू शकता. सोयीनुसार दरमहा किंवा वार्षिक पैसे जमा करण्याचा पर्याय यात मिळतो. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे १,००० रुपयांपेक्षा कमी रकमेत एनपीएस खातं उघडू शकता. एनपीएस खातं वयाच्या ६० व्या वर्षी मॅच्युअर होतं. नव्या नियमांनुसार, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत एनपीएस खातं सुरू ठेवू शकता.
उदाहरणाद्वारे समजून घेऊ. तुमच्या पत्नीचं वय ३० वर्षे आहे आणि तुम्ही त्यांच्या एनपीएस खात्यात दरमहा ५००० रुपये गुंतवता. गुंतवणुकीवर वार्षिक १० टक्के परतावा मिळाल्यास वयाच्या ६० व्या वर्षी त्यांच्या खात्यात एकूण १.१२ कोटी रुपये जमा होतील. यातून त्यांना सुमारे ४५ लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय त्यांना दरमहा सुमारे ४५ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यांना ही पेन्शन आयुष्यभर मिळत राहील.
३० वर्षे एकूण गुंतवणुकीचा कालावधी - ३० वर्षे, मासिक योगदान - ५,००० रुपये गुंतवणुकीवरील अंदाजित परतावा : १० टक्के, एकूण पेन्शन फंड - १,११,९८,४७१ रुपये मॅच्युरिटीवर काढता येतात. अॅन्युइटी प्लॅन खरेदी करण्यासाठी ४४,७९,३८८ रुपयांची आवश्यकता. ६७,१९,०८३ रुपये अंदाजे अॅन्युइटी रेट ८%, मासिक पेन्शन: ४४,७९३ रुपये.
एनपीएस ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशाचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड मॅनेजर्स करतात. केंद्र सरकार या प्रोफेशनल फंड मॅनेजर्सवर याची जबाबदारी देते. अशा परिस्थितीत एनपीएसमधील तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या पैशांवरील परताव्याची शाश्वती नसते. फायनान्शिअल प्लॅनर्सच्या मते, एनपीएसनं सुरुवातीपासून सरासरी १० ते ११ टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये (एनपीएस) दोन लाख रुपयांपर्यंत कर सवलत आणि ६० टक्के रक्कम काढल्यास करसवलत असे करसवलतीचे लाभ दिले जातात. एनपीएस ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये दीड लाख रुपयांची मर्यादा संपल्यानंतर ५०,००० रुपयांच्या अतिरिक्त गुंतवणुकीवरही सूट दिली जाते. या अतिरिक्त सवलतीमुळे तुम्ही एनपीएसमध्ये दरवर्षी २ लाख रुपयांपर्यंत एकूण कर वाचवू शकता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)