मोदी सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ति योजने'अंतर्गत महिलांना देतेय ५२,००० रुपये? झाला मोठा खुलासा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 04:32 PM2023-03-30T16:32:53+5:302023-03-30T16:49:52+5:30

केंद्र सरकारच्या योजनेतून महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. जर तुम्हीही कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी थोडी काळजी घ्या.

केंद्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असते. जर तुम्हाला एखाद्या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही अगोदर त्या योजनेच्या माहिती घ्यायला हवी.

कारण सध्या फसवणुकीचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत, सोशल मीडियावर अनेक खोट्या योजनांची माहिती दिली जात आहे.

काही दिवसापूर्वी एका यूट्यूब चॅनलवर महिलांसाठीच्या एका योजनेचा दावा केला आहे. यात सरकार महिलांना संपूर्ण ५२,००० रुपये रोख देत आहे. पीआयबीने तथ्य तपासणी करून या बातमीतील सत्यता शोधून काढली आहे.

पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये या योजनेचा खुलासा केला आहे. 'सुनो दुनिया' नावाच्या #YouTube चॅनेलच्या व्हिडीओमध्ये केंद्र सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना ५२,००० ची रोख रक्कम देत असल्याचा दावा केला जात आहे.

पीआयबीने हा व्हिडीओ पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही.

केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, अशी माहिती कोणाशीही शेअर करू नयेत. यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा.

अशा चुकीच्या माहितीपासून दूर राहा आणि ही माहिती कुणालाही शेअर करू नका, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर socialmedia@pib.gov.in वर मेल करू शकता.

शासनाच्या योजनासंदर्भात अनेक चुकीच्या माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांच्या यातून फसवणूक झाल्या आहेत.

यामुळे सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या योजनांची येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला योजनांची माहिती घ्यायची असेल तर सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.